शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

डीजेवर नाचताना धक्का लागला म्हणून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 20:23 IST

लग्नसमारंभात डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून सशस्त्र गुंडांनी पाच जणांवर प्राणघातक हल्ला चढवला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर चार तरुण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देचार गंभीर जखमी : नागपूरच्या कळमन्यातील लग्नसमारंभात घडला थरार, पाहुण्यांची पळापळ, प्रचंड दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नसमारंभात डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून सशस्त्र गुंडांनी पाच जणांवर प्राणघातक हल्ला चढवला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर चार तरुण गंभीर जखमी झाले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना कामठी मार्गावरच्या अमन लॉनमध्ये सोमवारी रात्री ११. ३० वाजता ही थरारक घटना घडली. निखिल हरिदास लोखंडे (वय २९) असे मृत तरुणाचे नाव आहे.
गोरेवाड्यातील रहिवासी विक्की सुनील डोंगरे (वय २८) हा त्याच्या एका मैत्रिणीच्या लग्नात सोमवारी रात्री काही मित्रांसह सहभागी झाला होता. लग्न समारंभ भरात आला असताना काही जणांनी डीजे सुरू केला. विक्की आणि त्याचे मित्र मैत्रिणी तसेच लग्नात सहभागी झालेले गुंड डीजेवर नाचू लागले. गुंडांपैकी एकाला विक्कीचा धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून आरोपींनी विक्कीसोबत वाद घातला. भांडण वाढल्याने लग्न समारंभात गोंधळ निर्माण झाला. अनेक पाहुणे निघून गेले. काहींनी कसेबसे समजावल्याने आरोपी बाजूला गेले. त्यानंतर काही वेळाने विक्कीवर अचानक सात ते आठ आरोपींनी घातक शस्त्रांनी हल्ला चढवला. ते पाहून विक्कीला वाचविण्यासाठी त्याचा मित्र निखिल लोखंडे, मोनू ऊर्फ निखिल कांबळे (रा. कुतुबशहा नगर), आकाश दिलीप लोखंडे (वय २८, रा. गोरेवाडा) आणि सोनू मोहन शाहू हे धावले. आरोपींनी त्यांच्यावर घातक शस्त्राचे घाव घातले. मानेवर घाव बसल्याने निखिल लोखंडेचा मृत्यू झाला. सिनेमातील एखाद्या हिंसक दृश्यासारखे आरोपी उपरोक्त तरुणांवर घाव घालत होते. त्यामुळे समारंभात एकच कल्लोळ निर्माण झाला. किंचाळ्या, आरडाओरडीमुळे समारंभात प्रचंड दहशत परसली. निखिल निपचित पडल्यानंतर आरोपी तेथून शिवीगाळ करीत पळून गेले. प्रचंड दहशतीत आलेल्या पाहुण्यांपैकी एकाने कळमना पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. विक्कीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून एकाची हत्या आणि चार जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कलम ३०२, ३०७, १४३, १४५, १४७, १४९, ५०४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.

आधीच लावून होते घात
कळमना पोलिसांनी हे थरारकांड डीजे वर नाचताना धक्का लागल्यामुळे झाल्याचे सांगितले असले तरी या प्रकरणात मूळ कारण वेगळेच असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. आरोपी विक्की आणि निखिलवर ‘नाजूक’ कारणामुळे घात लावून होते. विक्की या लग्नात सहभागी होणार, याची त्यांना माहिती होती. त्यामुळे ते तयारीनेच आले होते. कटकारस्थान करूनच त्यांनी हे हत्याकांड घडवून आणल्याची चर्चा आहे. दरम्यान, कळमन्याचे सहायक निरीक्षक राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी रात्रीपासून धावपळ करीत तीन आरोपींना ताब्यात घेतले. शुभम सिद्धी सोनी (वय २३) त्याचा मोठा भाऊ मनोज सोनी (वय २५) आणि राहुल बब्बूसिंग भाटी (वय २३) अशी त्यांची नावे आहेत.

मोकाट गुंडांमुळे घडले थरारकांड
कळमना परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. परिणामी गुंड मोकाट सुटले आहेत. रात्रीच नव्हे तर दिवसाही लुटमारीच्या घटना घडतात. ऑटो आणि अवैध प्रवासी वाहतूक करणारांच्या दोन गटात वाद आहे. त्यांच्यातील हाणामारी, खंडणी वसुली अन् वर्चस्वाचा वाद सर्वत्र चर्चेचा विषय असताना कळमना ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. ठाण्यातूनच अनेक प्रकरणात परस्पर गुन्हेगाराला मोकळे केले जाते. दरम्यान, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुंड मोकाट सुटल्याने कळमन्यात कोणताही मोठा गुन्हा घडू शकतो, ही भीती यापूर्वी लोकमतने व्यक्त केली होती. ती अखेर खरी ठरली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी शुभम सोनी हा खतरनाक गुन्हेगार आहे. त्याने यापूर्वीही प्राणघातक हल्लयाचे अनेक गुन्हे केले आहेत. त्याच्यावर जरब नसल्याने त्याने साथीदारांच्या मदतीने निखिलची हत्या केली तर अन्य चार जणांना गंभीर जखमी केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनnagpurनागपूर