शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

“तुम्ही त्यांना बोलण्यात व्यस्त ठेवा, आम्ही तातडीनं पोहचतोच”; फोन ठेवला अन् काही क्षणातच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 22:03 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमलबाई चौधरी या पती काशिनाथ ओंकार चौधरी आणि मुलगा सचिन चौधरी यांच्यासोबत रामेश्‍वर कॉलनी येथे वास्तव्यास होत्या

जळगाव : जीवनाला कंटाळली आहे, जीवाचे बरे वाईट करुन घेते असे जेठाणीला मोबाईलवर कॉल करुन दिरानीने धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता असोदा रेल्वेलाईनजवळ घडली. विमलबाई काशिनाथ चौधरी (वय ५५, रा.रामेश्‍वर कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली हे उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमलबाई चौधरी या पती काशिनाथ ओंकार चौधरी आणि मुलगा सचिन चौधरी यांच्यासोबत रामेश्‍वर कॉलनी येथे वास्तव्यास होत्या. बाजार समितीत भाजीपाला खरेदी करुन त्याच ठिकाणी भाजी विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होत्या.  बुधवारी सकाळी ७ वाजता विमलबाई नेहमीप्रमाणे भाजीपाला विक्रीसाठी पती व मुलगा सचिन यांच्यासोबत बाजार समितीत गेल्या. दुपारी १२ वाजता पती तसेच मुलगा या दोघांपैकी कुणालाच काही एक न सांगता रिक्षाने त्या थेट असोदा रेल्वे गेटजवळ पोहचल्या. तेथून त्यांनी मोबाईलवरुन जेठाणी तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी शोभा चौधरी यांना कॉल केला, मी कंटाळली असून जीवाचे बरेवाईट करुन घेते असे सांगून कॉल कट केला.

पोलीस पोहचले पण...

दिरानी असोदा रेल्वे गेटजवळील रुळाजवळ आत्महत्या करायला निघाली आहे, तात्काळ त्यांना रोखा म्हणून शोभा चौधरी यांनी शनीपेठ पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांना कळविले. ससे यांनी चौधरी यांना विमलबाई यांना फोनवर बोलण्यात व्यस्त ठेवा, आम्ही घटनास्थळी पोहचतोच असे सांगून तेही तातडीने निघाले. त्यानुसार शोभा चौधरी यांनी पुन्हा दिरानीला कॉल करुन बोलण्यात गुंतविले, पण पोलीस पोहचण्याआधीच रेल्वे आली अन‌् तिच्यासमोर झोकून त्यांनी जीवन संपविले. पोलीस घटनास्थळावर पोहचल्यावर दृष्य पाहून आपणही जीव वाचवू शकलो नसल्याचे शल्य त्यांच्या मनात बोचत होते.

पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. घटनेची माहिती मिळाल्यावर विमलबाई यांचे पती व मुलगा रुग्णालयात पोहचले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास हवालदार विलास शिंदे करीत आहे

टॅग्स :Policeपोलिस