शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Video - संतापजनक! "म्हातारे, मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू..."; वृद्ध महिलेला पोलिसाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:07 IST

Video - उन्नाव पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला पोलीस अधिकारी एका वृद्ध महिलेशी गैरवर्तन करताना दिसत आहे. "म्हातारे, माझं ऐक... मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू स्वत:चा चेहराही विसरून जाशील. मी तुझ्या बापाची नोकर नाही" असं म्हटलं आहे.

वृद्ध महिलेला त्रास देणारी पोलीस अधिकारी उन्नाव सदर पोलीस ठाण्यात तैनात असून उमा अग्रवाल असं तिचं नाव आहे. बंदूहार गावातील रहिवासी रिंकीने तिचा पती अमित कुमार, सासू छेदाना देवी, सासरे प्रेम, दीर विशाल आणि नणंद पूनम यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता, हे सर्वजण डकौलीमध्ये राहतात.

२८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी उमा अग्रवाल रिंकीसोबत डकौली गावात आली. येथे रिंकीची ६० वर्षांची सासू छेदाना देवीशी वाद झाला. याच वेळी "मी तुझ्या बापाची नोकर नाही" असं वृद्ध महिलेला म्हणाली. छेदाना देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी वारंवार तिला त्रास देत होती. तिला कागदपत्रावर सही करण्यास सांगितलं. तिने नकार दिल्यावर पोलीस अधिकारी संतापली.

"मी तुझं बुटाने तोंड फोडेन, तू स्वत:चा चेहराही विसरून जाशील" असंही म्हटलं आहे. कोतवाली पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा उमा अग्रवाल आल्या तेव्हा लोक संतापले आणि ओरडू लागले. त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. परिस्थिती चिघळताना पाहून उमाने हस्तक्षेप केला आणि परिस्थिती शांत केली. पोलिसांचं म्हणणं आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये संपूर्ण घटना दाखवली नाही. फक्त एक छोटासा भाग दाखवण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Outrageous! Cop Threatens Elderly Woman: 'I'll Kick Your Face!'

Web Summary : A video shows an Unnao policewoman, Uma Agarwal, verbally abusing an elderly woman, threatening violence. Agarwal is accused of mistreating the woman during a dowry harassment case investigation. The police claim the video is a partial representation of events.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ