Unravel suicide from mobile ?; Finding a password is a big challenge for cyber sales | आत्महत्येचा मोबाइलमधून उलगडा?; पासवर्ड शोधण्याचं मोठं सायबर सेलसमोर आव्हान

आत्महत्येचा मोबाइलमधून उलगडा?; पासवर्ड शोधण्याचं मोठं सायबर सेलसमोर आव्हान

राजेश भाेजेकर

चंद्रपूर : आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागे आत्महत्या की घातपात आहे ही बाब अद्याप स्पष्ट झाली नसली तरी डाॅ. शीतल यांनी आठ-दहा दिवसांपूर्वीच आपल्या मोबाइल, टॅब व लॅपटाॅपचे पासवर्ड बदलले असल्याची माहिती पुढे आली आहे. डाॅ. शीतल यांचे पती गौतम करजगी यांनाही हे पासवर्ड माहीत नाहीत. त्यामुळे पासवर्ड शोधण्याचे मोठे आव्हान सायबर सेलपुढे आहे. 

नागपूर पोलिसांची मदत घेतली जाणार
डाॅ. शीतल यांच्या दोन मोबाइलसह टॅब व लॅपटाॅप पोलिसांनी ताब्यात घेतलेत. एका मोबाइलला डाॅ. शीतल यांनी स्वत:चे ‘डोळे’ पासवर्ड ठेवला आहे. जोवर मोबाइल स्क्रीन शीतल यांचे डोळे ‘स्कॅन’ करणार नाही तोवर हा मोबाइल उघडणार नाही. पासवर्ड तोडण्यासाठी सायबरचे प्रयत्न निष्फळ ठरले. मोबाइल, टॅब व लॅपटाॅप पासवर्ड तोडण्यासाठी नागपूरला पाठविल्याचे सूत्राने सांगितले. प्राथमिक पोस्टमार्टममधून काहीही निष्पन्न झालेले नाही. 

आमटे कुटुंबीयांचे जबाब नोंदवणार 
शीतलच्या मृत्यूवर आमटे कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आमटे कुटुंबीय प्रचंड धक्क्यात असल्यामुळे त्यांचे जबाब नोंदविले नव्हते. परंतु, प्रकरण रहस्यमय बनल्याने पोलीस आमटे कुटुंबीयांचे जबाब नोंदविणार आहेत. 

 

Web Title: Unravel suicide from mobile ?; Finding a password is a big challenge for cyber sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.