तरुणीचे एटीएम कार्ड बदलून अज्ञात चोरट्याने काढले 25 हजार रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 03:16 PM2020-09-07T15:16:13+5:302020-09-07T15:16:42+5:30

ए टी एम सेंटर मध्ये आपल्या वडिलांचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका 23 वर्षीय मुलीला अज्ञात चोरट्यांने मदत करण्याच्या नावाखाली चक्क 25 हजार रुपयांचा गंडा घालून पोबारा केला

An unidentified person took out Rs 25,000 by changing the ATM card of the girl In Vasai | तरुणीचे एटीएम कार्ड बदलून अज्ञात चोरट्याने काढले 25 हजार रुपये 

तरुणीचे एटीएम कार्ड बदलून अज्ञात चोरट्याने काढले 25 हजार रुपये 

Next

वसई  - वसई पश्चिमेतील पार्वती क्रॉस स्थित युनियन बँक शाखेच्या ए टी एम सेंटर मध्ये आपल्या वडिलांचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका 23 वर्षीय मुलीला अज्ञात चोरट्यांने मदत करण्याच्या नावाखाली चक्क 25 हजार रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादी मुलीने माणिकपूर पोलिसांत हकीकत कथन केल्यावर पोलिसांनी त्या अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एका 23 वर्षीय फिर्यादी मुलगी शनिवारी आपल्या वडिलांच्या खात्यातून काढण्यासाठी व एटीएमचा पासवर्ड बदली करण्यासाठी युनियन बँकेच्या पार्वती क्रॉस शाखेत गेली असता एका अनोळखी इसमाने फिर्यादी मुलीला सांगितले की, मी तुझे एटीएम पासवर्ड चेंज करण्यात मदत करतो असे सांगून ती मुलगी ते एटीएम कार्ड घेऊन अज्ञात चोरा सोबत एटीएम सेंटर्स मध्ये गेली. 

दरम्यान याच संधीचा फायदा घेत त्या चोरट्यांने ते एटीएम कार्ड बदलून फिर्यादी मुलीच्या  वडिलांच्या खात्यातून एकूण 25 हजार रुपये काढून तिची फसवणूक तर केली आणि तिथून पोबारा केला. परिणामी काही वेळाने ही घटना लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाली हे असे समजल्यावर त्या मुलीने माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अखेर पोलिसांनी दखल घेत अज्ञात चोरावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

पालघर सायबर पोलिसांचे आवाहन 
पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सायबर पोलिस दलाकडून आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारच्या घटना विविध ठिकाणी घडत असून आपण एटीएम मशीनमधून पैसे काढत असताना इतर कोणत्याही व्यक्तीस आत किंवा सोबत घेऊ नये किंवा आपले एटीएम कार्ड दुसऱ्या व्यक्तीस देऊ नये व आपला एटीएम पिन कोड ही कुणाला सांगू नये,असे आवाहन सायबर पोलिस दल ,पालघर यांच्याकडून करण्यात आले आहे

Web Title: An unidentified person took out Rs 25,000 by changing the ATM card of the girl In Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.