उल्हासनगरात तोतया पोलिसांनी दुकानदाराला लुटले, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 11:28 IST2020-08-05T11:27:58+5:302020-08-05T11:28:14+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-५, शांती प्रकाश आश्रम येथील हिरापूरी चौकात अरुण साळुंके यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता दोन तरुण मोटारसायकली वरून येवून पोलिस असल्याची बतावणी केली.

In Ulhasnagar, fake police robbed a shopkeeper; case filed | उल्हासनगरात तोतया पोलिसांनी दुकानदाराला लुटले, गुन्हा दाखल

उल्हासनगरात तोतया पोलिसांनी दुकानदाराला लुटले, गुन्हा दाखल

उल्हासनगर : पोलिस असल्याचा बहाणा करून दुकानदाराची सोन्याची चेन व अंगठी लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी १ वाजता हिरापुरी चौक येथे घडला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-५, शांती प्रकाश आश्रम येथील हिरापूरी चौकात अरुण साळुंके यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता दोन तरुण मोटारसायकली वरून येवून पोलिस असल्याची बतावणी केली. दुकानात गुटखा असल्याची माहिती मिळाली असून पंचनामा करीत असल्याचे सांगितले. तसेच दुकानदाराला पंचनामा वेळी गळ्यातील व हाताच्या बोटात सोन्याची चेन व अंगठी एका कागदात ठेवण्यास सांगितले. हात चलाखीने सोने ठेवलेले कागद घेवून पंचानामाचा नावाखाली तेथून धूम ठोकली. सदर प्रकार दुकानदाराच्या लक्षात आल्यावर, त्यांनी हिललाईन पोलिस ठाणे गाठून सदर प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: In Ulhasnagar, fake police robbed a shopkeeper; case filed

टॅग्स :Policeपोलिस