शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बांगलादेशीला मदत करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 2:38 AM

नोव्हेंबर २०१९ मध्ये तालुका पोलिसांनी मनोहर राहू पवार या नावाने चिखले गावात राहणा-या ईनामुल मुल्ला याला अटक केली होती.

-  मयूर तांबडेपनवेल - चिखले गावात घरजावई म्हणून राहणा-या बांगलादेशी ईनामुल मुल्ला याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्याला मदत करणा-या दोघांना तालुका पोलिसांनी १७ जानेवारीला अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. सारिका पवार व राहू लक्ष्मण पवार अशी दोघांची नावे आहेत. सारिका ईनामुलची पत्नी आहे.नोव्हेंबर २०१९ मध्ये तालुका पोलिसांनी मनोहर राहू पवार या नावाने चिखले गावात राहणा-या ईनामुल मुल्ला याला अटक केली होती. त्याच्याकडे सापडलेल्या बेकायदेशीर व विविध शासकीय कागदपत्रांमुळे तो चर्चेत आला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर तालुका पोलिसांनी व इंटेलिजन्स ब्युरो यांनी अधिक तपास करत अनेकांची चौकशी केली. त्यानंतर इनामुल यास मदत करणारी त्याची पत्नी सारिका अनंता गायकर (माहेरचे नाव, वय ३५) हिला व बेलवली येथील राहू लक्ष्मण पवार (५०) या दोघांना अटक केली. या दोघांनी इनामुल मुल्ला या बांगलादेशी नागरिकास मदत केली असल्याचा आरोप आहे.बेलवली येथील राहू पवार यांच्याकडे ईनामुल मुल्ला (मनोहर पवार) हा लहानपणापासून काम करत होता. त्यामुळे त्याचे नाव बदलून मनोहर राहू पवार असे ठेवण्यात आले. त्यानंतर त्याचे चिखले येथील सारिका अनंत गायकर या मुलीसोबत २०११ मध्ये लग्न लावण्यात आले होते. त्याला दोन मुले आहेत. दोन महिन्यांपूर्वी तो बांगलादेशला गेला होता. यावेळी आयबीला संशय आला.संशय बळावल्याने केली अटकमराठी नाव असलेला माणूस १५ दिवस बांगलादेश येथे जाऊन एका गावात राहतो व पुन्हा परत येतो. या संशयाच्या आधारे त्यांनी त्याची कागदपत्रे पडताळणी व इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. या संदर्भात नवी मुंबई परिमंडळ २ च्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, साहाय्यक निरीक्षक विजय खेडकर, हवालदार मंगेश महाडिक, धीरज पाटील, राकेश मोकल, संतोष चौधरी यांनी चिखलेतून त्याला अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई