खरं की खोटं... वडिलांच्या प्रत्येक दाव्याची चौकशी; रात्रीच घाईघाईत केले ३ बहिणींचे अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:37 IST2026-02-06T12:34:57+5:302026-02-06T12:37:10+5:30
रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारावर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनीही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

फोटो - आजतक
गाझियाबादमधील 'भारत सिटी' सोसायटीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवणाऱ्या तीन अल्पवयीन बहिणींच्या प्रकरणात पोलीस आता सर्व बाजूंनी तपास करत आहेत. घटनेनंतर समोर आलेल्या प्रत्येक दाव्याची सखोल चौकशी केली जात आहे. शवविच्छेदनानंतर वडिलांनी तिन्ही मुलींना मुखाग्नी दिला, मात्र रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारावर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनीही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
शवविच्छेदनानंतर बुधवारी यमुना नदीच्या काठावर असलेल्या दिल्लीतील निगम बोध घाट येथे तिन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शालीमार गार्डनचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, अंत्यसंस्कार त्यांच्या वडिलांनी केले. मात्र, बुधवारी रात्रीच अंत्यसंस्कार का करण्यात आले, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. हे त्यांचे वैयक्तिक कारण असू शकते, असे एसीपींनी सांगितले.
शवविच्छेदन अहवालात तिन्ही मुलींचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याची पुष्टी झाली आहे. गाझियाबादच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, रात्री अंत्यसंस्कार करण्यामागे कोणतेही संशयास्पद कारण समोर आलेलं नाही, हा कुटुंबाचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. तरीही, इतकी मोठी घटना घडल्यानंतर इतक्या घाईने हा निर्णय का घेतला गेला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
"आम्हाला कोरियाला घेऊन चला, तिथल्या शाळेत..."; ३ मुली गमावलेल्या वडिलांचा खळबळजनक दावा
सुरुवातीला ही घटना 'कोरियन गेम'च्या व्यसनाशी जोडून पाहिली गेली होती, परंतु आता त्याच कथेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. पोलिसांच्या तपासाची दिशा आणि जप्त केलेल्या डायरीतील मजकूर वडिलांच्या सुरुवातीच्या दाव्यांशी जुळत नसल्याचे दिसत आहे. घटनेनंतर वडील चेतन कुमार यांनी दावा केला होता की, त्यांच्या तिन्ही मुली गेल्या तीन वर्षांपासून एका कोरियन टास्क-आधारित गेम किंवा एपच्या प्रभावाखाली होत्या.
"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहिणींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं?
याच कारणामुळे मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते आणि स्वतःला सर्वांपासून वेगळे करून घेतले होते. हा दावा सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये वेगाने पसरला. मात्र आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना असा कोणताही तांत्रिक किंवा डिजिटल पुरावा मिळालेला नाही, ज्यावरून मुली कोणत्याही अशा एपचा वापर करत होत्या हे सिद्ध होईल. ट्रान्स-हिंडनचे डीसीपी निमिष पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या पोलिसांकडे या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही पुरावा नाही.
"प्लीज, आपल्या मुलांना गेम खेळू देऊ नका...", ३ लेकी गमावलेला बाप खचला, ढसाढसा रडला
मुलींच्या खोलीतून पोलिसांना नऊ पानांची एक पॉकेट डायरी मिळाली आहे. ही डायरी केवळ भावनांनी भरलेली नसून त्यात असे अनेक संकेत आहेत, जे डिजिटल व्यसनापेक्षा घरगुती कलहाकडे अधिक निर्देश करतात. डायरीमध्ये कोरियन संस्कृतीबद्दलच्या आकर्षणाचा उल्लेख आहे, परंतु कुठेही कोणत्याही विशिष्ट एप, गेम किंवा ऑनलाइन टास्कचा स्पष्ट उल्लेख नाही. त्याऐवजी, मुली त्यांच्या आवडीनिवडीवरून कुटुंबाशी सतत संघर्ष करत असल्याचे भाषेवरून जाणवते. डायरीतील काही भाग थेट पालकांवर प्रश्न उपस्थित करतात.
जीवघेणा 'कोरियन लव्हर' गेम! प्राची बनली 'डेथ कमांडर'; फोनमध्ये दडलंय 'शेवटच्या टास्क'चं रहस्य
पोलीस तपासात कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची माहितीही समोर आली आहे. रेसिडेंट्स असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याच्या मते, वडिलांना शेअर बाजारात मोठं नुकसान झालं होतं. वडील चेतन यांनी स्वतः मान्य केलं आहे की त्यांना २० ते ३० लाखांचे नुकसान झालं आहे. शेजाऱ्यांनी असेही सांगितले की, आर्थिक टंचाईमुळे घरात तणावाचं वातावरण असायचं आणि वाद होणं ही सामान्य बाब होती. पोलीस या पैलूची अधिकृत चौकशी करत आहेत. सोसायटीतील लोकांचं म्हणणं आहे की मुली बऱ्याच काळापासून शाळेत जात नव्हत्या.