TRP Scam: ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट केवळ दाेन मित्रांमधील संभाषण; वकिलांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 02:40 AM2021-03-23T02:40:52+5:302021-03-23T02:41:20+5:30

अनिश्चित काळासाठी तपास सुरू न ठेवण्याचे व गोस्वामींसह अन्य कर्मचाऱ्यांना तपास प्रलंबित असेपर्यंत अटक करू नये, असे निर्देश देण्याची  विनंतीही त्यांनी केली. 

TRP Scam: ‘They’ WhatsApp chat only conversations between friends; Lawyers claim | TRP Scam: ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट केवळ दाेन मित्रांमधील संभाषण; वकिलांचा दावा 

TRP Scam: ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट केवळ दाेन मित्रांमधील संभाषण; वकिलांचा दावा 

Next

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट हे केवळ दोन जवळच्या मित्रांमधील संभाषण होते. त्याचा टीआरपीशी काहीही संबंध नाही, असे अर्णब यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सोमवारच्या सुनावणीत सांगितले. 

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कोणते महत्त्वाचे पुरावे दिले आहेत, असा सवाल न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने करताच एआरजीतर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी यांनी सांगितले की, या घोटाळ्यातील महत्त्वाचे पुरावे म्हणजे गोस्वामी व दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट आहे. संदर्भ सोडून हे चॅट केस उभी करण्यासाठी वापरण्यात आले. दोघेही बाजारातील ट्रेंडविषयी व्हॉट्सॲप चॅटद्वारे गप्पा मारत आहेत. हे चॅट दोन जवळच्या मित्रांमधील आहे. टीआरपी घोटाळ्यासंदर्भात एकही मेसेज त्यात नाही. तर, गोस्वामी यांना मदत करण्यासाठी दासगुप्ता यांनी  रिपब्लिक टीव्हीच्या बाजूने टीआरपी वाढविला होता का?  असा सवाल खंडपीठाने मुंदर्गी यांना केला. त्यावर हे पोलिसांचे म्हणणे आहे; परंतु दोन दोषारोपपत्र सादर करूनही पोलीस हे सिद्ध करू शकले नाहीत. गोस्वामी व एआरजीच्या अन्य कर्मचाऱ्यांना पोलिसांनी केवळ संशयित आरोपी म्हणून दाखविले आहे. पोलीस तपासाला विलंब करून त्यांची छळवणूक करीत आहेत, असे मुंदर्गी यांनी सांगितले. अनिश्चित काळासाठी तपास सुरू न ठेवण्याचे व गोस्वामींसह अन्य कर्मचाऱ्यांना तपास प्रलंबित असेपर्यंत अटक करू नये, असे निर्देश देण्याची  विनंतीही त्यांनी केली. 

चौकशी केली का?  
तपास यंत्रणा एखाद्यावर अत्याचार करण्यासाठी तपासाचा साधन म्हणून वापर करीत असेल तर न्यायालय किती प्रमाणात यावर भाष्य करू शकेल? गोस्वामी आणि अन्य कर्मचाऱ्यांना तुम्ही आरोपी करणार नसाल तर हे सर्व व्यर्थ आहे, असे न्यायालयाने नमूद केले, तसेच गोस्वामींना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले का? असा प्रश्न विचारला. 

Web Title: TRP Scam: ‘They’ WhatsApp chat only conversations between friends; Lawyers claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.