आमदार पीएच्या घरात चोरी, भावोजीच्या पैशावर मेहुण्याने मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 07:57 PM2020-06-16T19:57:14+5:302020-06-16T20:05:53+5:30

तीन महिन्यांनी गुन्हा उघडकीस, दोघांना अटक

Theft in MLA PA's house, brother-in-law duped his money | आमदार पीएच्या घरात चोरी, भावोजीच्या पैशावर मेहुण्याने मारला डल्ला

आमदार पीएच्या घरात चोरी, भावोजीच्या पैशावर मेहुण्याने मारला डल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देया प्रकरणी मेहुण्यासह त्याचा साथीदाराला अटक करण्यात आली असून दोघांकडून रोकडही जप्त करण्यात आली आहे.या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. या दोघाकडील चोरीची ७० हजाराची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.

सांगली : आमदारांचे पीए असलेल्या भाऊजीच्या घरावर मेहुण्यानेच डल्ला मारत ७० हजाराची रोकड लंपास केली होती. तीन महिन्यानंतर या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. या प्रकरणी मेहुण्यासह त्याचा साथीदाराला अटक करण्यात आली असून दोघांकडून रोकडही जप्त करण्यात आली आहे.


निर्मलकुमार उर्फ बबन बापूसाहेब गायकवाड (वय २७ रा. ढवळी, ता. मिरज) व दीपक बाळासाहेब पाटील (३१, रा. बेडग, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील निर्मलकुमार हा भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांचे स्वीय सहाय्यक अमोल कणसे यांचा मेहुणा आहे. या चोरीप्रकरणी कणसे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कणसे यांच्या घरात पैसे असल्याची माहिती निर्मलकुमार याला होती. त्याने हे पैसे चोरण्याचा प्लॅन केला. त्यासाठी त्याचा मित्र दीपक पाटील यालाही बरोबर घेतले. रंगपंचमीदिवशी १३ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कणसे यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून या दोघांनी घराचे कुलुप लोखंडी कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. घराच्या कपाटातील ७० हजाराची रोकड घेऊन दोघांनी पलायन केले. या चोरीबाबत विश्रामबाग पोलिसांत नोंद झाली होती.


स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, हेड कॉन्टेबल अमित परीट, मेघराज रुपनर, आमसिद्धा खोत, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, विकास भोसले, अजय बेंद्रे यांचे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा शोध घेत असताना कणसे यांच्या घरी झालेल्या चोरीबाबत माहिती मिळाली. पथकाने निर्मलकुमार गायकवाड व दीपक पाटील या दोघांना मिरजेतील डॉ. चिवटे रुग्णालयाजवळून ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. या दोघाकडील चोरीची ७० हजाराची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

तब्बल २२५ कोटींची केली कर चुकवेगिरी, ठग उद्योगपतीला मुंबईतून अटक

 

अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

 

लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल 

 

डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर 

 

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

बकरी चोरली म्हणून युवकाला नग्न करून मारहाण, पैशांची मागणी करत बनवला व्हिडीओ

 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल

Web Title: Theft in MLA PA's house, brother-in-law duped his money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.