अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:02 PM2020-06-16T14:02:10+5:302020-06-16T14:06:34+5:30

भारतीय सुरक्षा दलाने स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ यांच्यासमवेत संयुक्त पथक तयार करुन संपूर्ण गावाला घेरण्यात आले. जेव्हा या भागात शोध मोहीम सुरू झाली, त्यावेळी  दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांनी चोख उत्तर देत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. 

Revenge finally! Hizbul's top commander killed with two terrorists in shopian by indian army | अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

Next
ठळक मुद्देविशेष म्हणजे या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरही मारला गेला. नुकतीच दहशदवाद्यांनी सरपंच अजय पंडिता यांची हत्या केली होती. त्याचाच या चकमकीद्वारे सुरक्षा दलाने बदला घेतला.शोपियानमध्ये आज तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले. त्यातील एक हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर आहे. याच टॉप कमांडरने सरपंच अजय पंडित यांची हत्या केली होती.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये तुर्कवांगम येथे आज सकाळी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरही मारला गेला. नुकतीच दहशदवाद्यांनी सरपंच अजय पंडिता यांची हत्या केली होती. त्याचाच या चकमकीद्वारे सुरक्षा दलाने बदला घेतला.

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले की, शोपियानमध्ये आज तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले. त्यातील एक हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर आहे. याच टॉप कमांडरने सरपंच अजय पंडिता यांची हत्या केली होती. सुरक्षा दलाने अजय पंडिता यांच्या मृत्यूचा बदला घेत या टॉप कमांडरला कंठस्थान घातले आहे. महत्वाचे म्हणजे सुरक्षा दलाने एका महिन्यात जवळजवळ ३० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये १० दिवसांत १७ दहशतवादी मारले गेले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार केले असून कारवाई सुरू आहे. घटनास्थळाहून शस्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती दिली.

पूंछ, पुलवामा, राजौरी आणि शोपियान सेक्टरमध्ये कारवाई करून १० दिवसांमध्ये २३ दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. हे दहशतवादी शोपियांच्या तुर्कवांगम गावात लपून मोठा कट रचत असल्याची माहिती जवानांना मिळाली. माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलाने स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ यांच्यासमवेत संयुक्त पथक तयार करुन संपूर्ण गावाला घेरण्यात आले. जेव्हा या भागात शोध मोहीम सुरू झाली, त्यावेळी  दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला जवानांनी चोख उत्तर देत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. 



 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल 

 

डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर 

 

अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार

 

Coronavirus : बापरे! रुग्णालयातून संभाव्य कोरोना रुग्ण झाला बेपत्ता, कुटुंबीयांनी केली पोलिसात तक्रार

 

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

Web Title: Revenge finally! Hizbul's top commander killed with two terrorists in shopian by indian army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.