सुडाचा थरार! आईच्या जुन्या प्रियकराला मुलानं १० वर्षांनंतर गाठलं अन् राक्षसी पद्धतीन संपवलं; भररस्त्यात...! थरकाप उडवणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:57 IST2026-02-04T18:57:17+5:302026-02-04T18:57:31+5:30

पोलीस येईपर्यंत तो मृताच्या छातीवर पाय ठेवून उभा होता. दहा वर्षांपूर्वीच्या वैमनस्यातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. इराया माथापती असे आरोपीचे नाव असल्याचे समजते...

The thrill of revenge The son met his mother's old lover after 10 years and finished him off in a brutal way On the street A shocking incident | सुडाचा थरार! आईच्या जुन्या प्रियकराला मुलानं १० वर्षांनंतर गाठलं अन् राक्षसी पद्धतीन संपवलं; भररस्त्यात...! थरकाप उडवणारी घटना

सुडाचा थरार! आईच्या जुन्या प्रियकराला मुलानं १० वर्षांनंतर गाठलं अन् राक्षसी पद्धतीन संपवलं; भररस्त्यात...! थरकाप उडवणारी घटना

कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या आईच्या जुन्या प्रियकराची चाकूने भोसकून अत्यंत क्रूरपणे हत्या केली. यानंतर आरोपीने स्वतःहून पोलिसांना फोन करून बोलावले. एढेच नाही तर, पोलीस येईपर्यंत तो मृताच्या छातीवर पाय ठेवून उभा होता. दहा वर्षांपूर्वीच्या वैमनस्यातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. इराया माथापती असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.

वडिलांचा बदला, नेमकं घडलं काय? 
ही घटना सोमवारी सायंकाळी बसाडोनी गावाजवळ घडली असून बसप्पा होसमणी (वय ५१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इराया माथापतीने होसमणी यांना रस्त्यातच अडवले आणि मोटारसायकलवरून खाली पाडत त्यांच्यावर चाकूने सपासप तब्बल १६ वार केले. भररस्त्यात हा संपूर्ण थरार सुरू होता. मात्र कोणाचीही त्याला रोखण्याची हिंमत झाली नाही.

सूडाची आग - 
आरोपी माथापतीने पोलिसांना दिेलेल्या माहितीनुसार, बसप्पा होसमणी दहा वर्षांपूर्वी त्याच्या आईला घेऊन पळून गेला होता आणि कोल्हापुरात राहत होता. काही दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता. आपल्या वडिलांचा आणि घराचा बदला घेण्यासाठी माथापतीने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. सवादत्ती येथील येल्लम्मा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तो बसप्पाची वाट बघत बसला होता. तो येताच आरोपीने त्याच्यावर हल्ला केला.

हत्या केल्यानंतरही माथापती घटनास्थळीच उभा होता. त्याने स्वतः पोलिसांना माहिती दिली. तो मृतदेहाजवळच होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून पुढील तपास सुरू आहे.
 

Web Title : बेटे ने 10 साल बाद मां के पूर्व प्रेमी को दिनदहाड़े मार डाला

Web Summary : बेलगाम में, एक व्यक्ति ने अपनी मां के पूर्व प्रेमी की हत्या कर दी, उसे बार-बार चाकू मारा। आरोपी, एक दशक पुरानी दुश्मनी से प्रेरित होकर, पीड़ित का इंतजार कर रहा था और मौके पर पुलिस के सामने आत्मसमर्पण कर दिया, अपराध कबूल कर लिया।

Web Title : Son Kills Mother's Ex-lover After 10 Years in Broad Daylight

Web Summary : In Belgaum, a man murdered his mother's former lover, stabbing him repeatedly. The accused, fueled by a decade-old grudge, waited for the victim and surrendered to police at the scene, confessing to the crime.