शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नी बनून हॉटेलमध्ये राहिलं अल्पवयीन जोडपं; संशयावरुन बॉयफ्रेंडनं कानाखाली मारताच गर्लफ्रेंडनं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 11:48 IST

अल्पवयीन मुला-मुलीने जोडपं असल्याचं सांगत हॉटेलमध्ये एक रुम घेतली. स्वत:ला विवाहित असल्याचं दाखवण्यासाठी या दोघांनी बनावट ओळखपत्रही दाखवले.

उज्जैन – मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका अल्पवयीन मुलीनं हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये राहत होती. बॉयफ्रेंडही अल्पवयीन आहे. हॉटेलमध्ये राहण्यासाठी  दोघांनी पती-पत्नी असल्याचा बनाव केला. विवाहित जोडपं म्हणून त्यांना हॉटेलमध्ये रुम देण्यात आली होती. त्यानंतर जे घडलं त्याने हॉटेल व्यवस्थापनाची भंबेरी उडाली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुला-मुलीने जोडपं असल्याचं सांगत हॉटेलमध्ये एक रुम घेतली. स्वत:ला विवाहित असल्याचं दाखवण्यासाठी या दोघांनी बनावट ओळखपत्रही दाखवले. सोमवारी रात्री मुलाचा मित्रही त्या हॉटेलमध्ये आला. त्यानंतर काही वेळातच मुलीने तिसऱ्या मजल्यावरून खिडकीतून उडी मारली असं पोलिसांनी सांगितले. बॉयफ्रेंडला मुलीवर शंका होती. मुलाच्या मित्रासोबत मुलीचे संबंध असल्याचा संशय त्याला आला. तोच मित्र सोमवारी हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आला होता. बॉयफ्रेंडने मित्रासमोर मुलीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती देण्यात आली आहे.

बॉयफ्रेंड आणि हॉटेल मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी अल्पवयीन बॉयफ्रेंड आणि हॉटेल मॅनेजरविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल मॅनेजरने बनावट ओळखपत्राच्या आधारे अल्पवयीन जोडप्याला हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी दिली होती. सोमवारी हॉटेलमध्ये जो मित्र भेटायला आला त्याबद्दल पोलिसांनी आत्महत्येच्या घटनेत त्याची भूमिका सापडत नाही असा दावा केला आहे.

घटनेच्या वेळी अनेक लोक हॉटेलमध्ये थांबले होते

काही प्रत्यक्षदर्शींसोबत पोलिसांनी संवाद साधला असता घटनेच्यावेळी हॉटेलमध्ये खूप लोकं होती असं माहिती पडलं. पोलीस म्हणाले की, अनेकांनी मुलांना एकमेकांशी भांडताना पाहिलं होतं. त्या सगळ्यांचे जबाब नोंदवले आहेत. हे दोघंही अल्पवयीन मुलं जेव्हापासून हॉटेलमध्ये राहत होते तेव्हापासून त्याच्या आईवडिलांना त्यांच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. विशेष म्हणजे पालकांनी मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नाही याने पोलीस हैराण आहेत. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृत मुलीचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. तर अल्पवयीन बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलं आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश