चादरीच्या एका 'टॅग'ने प्रकरण फिरलं; प्रेयसीची हत्या करून पुरावा नष्ट करणाऱ्या प्रियकराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:44 IST2026-05-07T19:44:25+5:302026-05-07T19:44:51+5:30

गुजरातमध्ये प्रियकराने संशयाच्या भरात प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची ङटना समोर आली आहे.

Tag Leads Police to Killer Gujarat Man Murders Girlfriend Over Suspicion of Affair | चादरीच्या एका 'टॅग'ने प्रकरण फिरलं; प्रेयसीची हत्या करून पुरावा नष्ट करणाऱ्या प्रियकराला अटक

चादरीच्या एका 'टॅग'ने प्रकरण फिरलं; प्रेयसीची हत्या करून पुरावा नष्ट करणाऱ्या प्रियकराला अटक

Gujarat Crime: प्रेमात संशय किती भयानक ठरू शकतो, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातून समोर आली आहे. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या कुणाशी तरी अफेअर असल्याच्या संशयातून एका २४ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केली. लॅपटॉपच्या चार्जरने गळा आवळून त्याने हा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून एका निर्जनस्थळी फेकून दिला. मात्र, पोलिसांनी केवळ एका बेडशीटच्या टॅगवरून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मृत तरुणीची ओळख दिव्या परमार (२४) अशी झाली आहे. दिव्या एका खाजगी रुग्णालयात काम करत होती. ३ मे रोजी ती घराबाहेर मेहंदी काढण्यासाठी जाते असे सांगून निघाली होती, मात्र ती परतलीच नाही. आरोपी रोहन परमार (२५) याने तिला गाठले आणि आधी वडोदरा येथील अंकोडिया भागातील एका वॉटर पार्कमध्ये नेले. त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्यात वाद सुरू झाला. रोहनने तिच्यावर संशय घेत भांडण केले आणि संतापच्या भरात लॅपटॉप चार्जरने तिचा गळा आवळून तिला संपवले.

पाच दिवसांपूर्वीच रचला होता हत्येचा कट

पोलिस तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रोहनने ही हत्या रागाच्या भरात नाही तर पूर्ण नियोजन करुन केली होती. हत्येच्या पाच दिवस आधीच त्याने हा कट रचला होता. हत्या केल्यानंतर त्याने तिचा मोबाईल बंद केला आणि तिचा मृतदेह एका बेडशीटमध्ये गुंडाळून पळ काढला.

'डी-मार्ट'च्या टॅगने उघड केले हत्येचे गुपित

वडोदरा ग्रामीणचे एसपी सुशील अगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मृतदेह ज्या बेडशीटमध्ये गुंडाळलेला होता, त्यावर डी-मार्ट कंपनीचा एक टॅग पोलिसांना सापडला. पोलिसांनी या एका धाग्यावरून तपास सुरू केला. परिसरातील सर्व डी-मार्ट स्टोअर्सचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रोहनने हत्येच्या दोन दिवस आधीच ही बेडशीट खरेदी केल्याचे दिसून आले. या फुटेजमुळे त्याची ओळख पटली आणि पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला नेत्रांग परिसरातून अटक केली.

सोशल मीडियामुळे पालकांनी ओळखला मृतदेह

दिव्या घरी न परतल्याने तिचे पालक तिचा शोध घेत होते. दरम्यान, सोशल मीडियावर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. ती बातमी पाहून दिव्याच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि आपल्या मुलीचा मृतदेहाची ओळख पटवली.

एका कॅफेमध्ये झाली होती ओळख

आरोपी रोहन हा बोदेलीचा रहिवासी असून वडोदरा येथील एका कॅफेमध्ये काम करत होता. दिव्या ज्या खाजगी रुग्णालयात काम करायची, ते या कॅफेच्या अगदी समोर होते. तिथूनच त्यांची ओळख झाली होती आणि गेल्या सहा महिन्यांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र, संशयाने या नात्याचा धक्कादायक शेवट केला. 

Web Title : चादर के टैग से खुला गुजरात हत्याकांड; प्रेमी गिरफ्तार

Web Summary : गुजरात में ईर्ष्या से प्रेरित हत्या। एक युवक ने अपनी प्रेमिका की हत्या कर दी, उसे बेवफाई का शक था। उसने शव को चादर में लपेटा। चादर पर डी-मार्ट टैग ने पुलिस को उस तक पहुंचाया। उसे गिरफ्तार कर लिया गया; अपराध पूर्व नियोजित था।

Web Title : Bed Sheet Tag Unravels Gujarat Murder; Boyfriend Arrested

Web Summary : Jealousy fueled a Gujarat murder. A man killed his girlfriend, suspecting infidelity. He wrapped the body in a bedsheet. A D-Mart tag on the sheet led police to him. He was arrested; the crime was pre-planned.