शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीणीसोबत पार्टी करण्यासाठी विद्यार्थ्याने केले कॉफी शॉपचे सर्व्हर हॅक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 20:51 IST

Cyber Crime : बाल न्यायालयाने ठरविले दोषी : पालकांना सावध राहण्याचे आवाहन

ठळक मुद्देतांत्रिक पुराव्याच्या आधारे पथक या विद्यार्थ्याला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करत सायबर पोलिसांनी तपास सुरु केला. 

मुंबई : मैत्रीणीसोबत मौजमजा, पार्टी करण्यासाठी १७ वर्षीय सीएचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने कॉफी शॉपचे सर्व्हर हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार सायबर पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याला बाल न्यायालयाने दोषी ठरविले आहे. 

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अंकित सिंघवी यांच्या कॉफी शॉपच्या गिफ्टकार्ड जमा असलेली रक्कम दुसऱ्या खात्यात जमा झाल्याचे समजताच त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार सायबर पोलिसांनी २८ सप्टेबर रोजी गुन्हा नोंद करत तपास सुरु केला. चौकशीत अंकित यांच्यासह देशभरातील अन्य राज्यातील ग्राहकांच्या खात्यातूनही अशाप्रकारे पैसे ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. याप्रकरणी गुन्हा नोंद करत सायबर पोलिसांनी तपास सुरु केला. 

तांत्रिक पुराव्याच्या आधारे पथक या विद्यार्थ्याला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. मित्र मैत्रीणीसोबत मौजमजा तसेच पार्टी करण्यासाठी हा प्रताप केल्याचे सांगितले. स्वतःची ओळख लपवून इंटरनेटचा वापर केला. तसेच बनावट सीमकार्डचाही आधार घेण्यात आला होता. यूट्यूबवरून त्याने याचे प्रशिक्षण घेतले. याबाबत आरोप पत्र बाल न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्याला दोषी ठरवत, १ वर्षाचे चांगल्या वर्तवणुकीच्या १५ हजार रूपयांचे बंधपत्रावर तसेच २ वर्ष संस्थेच्या अधिपत्याखाली समुपदेशन करण्याचे आदेश दिले आहेत.

पालकांनो काळजी घ्या...

 पालकांनी आपला पाल्य फोन, लॅपटॉपवर क़ाय करत आहेत? सोशल मिडियावर ते क़ाय पाहतात? ते सोशल मिडियावर कुणाच्या संपर्कात आहे का? यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन सायबर पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMumbaiमुंबईPoliceपोलिसCourtन्यायालय