प्रेम महत्वाचं की फक्त शरीरसंबंध? पत्नीच्या 'त्या' VIDEOमुळे हादरला पती; मृत्यूआधी विचारला अस्वस्थ करणारा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 11:55 IST2026-05-01T11:46:45+5:302026-05-01T11:55:48+5:30

हैदराबादमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृतदेह हुसेन सागर तलावात सापडला.

Software Engineer Dies in Hyderabad 19 Page Note Blames Wife Affairs | प्रेम महत्वाचं की फक्त शरीरसंबंध? पत्नीच्या 'त्या' VIDEOमुळे हादरला पती; मृत्यूआधी विचारला अस्वस्थ करणारा सवाल

प्रेम महत्वाचं की फक्त शरीरसंबंध? पत्नीच्या 'त्या' VIDEOमुळे हादरला पती; मृत्यूआधी विचारला अस्वस्थ करणारा सवाल

Hyderabad Software Engineer Death:  आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद शहरात एका सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या खासगी व्हिडिओंमुळे  मानसिक तणावातून ३६ वर्षीय एस. सीताराम रेड्डी यांनी हुसेन सागर तलावात उडी मारून आपले जीवन संपवले. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली १९ पानांची सुसाईड नोट आता समोर आली असून, पोलिसांनी याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले सीताराम रेड्डी हैदराबादमधील एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होते. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळाला सुरुवात झाली. सीताराम यांनी ८ फेब्रुवारी रोजी हुसेन सागर तलावात उडी घेतली. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. मात्र, तपासादरम्यान पोलिसांच्या हाती जी १९ पानांची सुसाईड नोट लागली, त्यातील खुलाशांनी पोलीसही चक्रावून गेले आहेत.

सुसाईड नोटमधील खळबळजनक दावे

सीताराम यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्नीचे गेल्या दीड वर्षांपासून तीन वेगवेगळ्या व्यक्तींशी अनैतिक संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. सीताराम यांनी नोटमध्ये म्हटलं की, त्यांच्या पत्नीने एका प्रियकरासोबतचे खासगी क्षण रेकॉर्ड केले होते. हे व्हिडिओ नंतर रमना नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. आपल्या पत्नीचे हे रूप पाहून सीताराम यांना मोठा धक्का बसला होता. पती कामावर असताना प्रियकर घरी येत असे, असाही आरोप पत्रात करण्यात आला आहे.

मी माझ्या पत्नीच्या सर्व गरजा पूर्ण केल्या, तिला कशाचीही कमतरता भासू दिली नाही. तरीही तिने मला फसवले. त्या व्हिडिओने मला आतून तोडून टाकले. एखादी मुलगी आपले खासगी व्हिडिओ का रेकॉर्ड करते? तिला नक्की काय हवे होते-  प्रेम की फक्त शरीरसंबंध? असा सवाल सीताराम यांनी चिठ्ठीत विचारला आहे.

पोलिस कारवाई आणि तपास

सीताराम यांच्या वडिलांनी आपल्या सुनेवर मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवत पत्नी आणि तिचा प्रियकर एम. रमना रेड्डी याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले असून सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हिडिओंची चौकशी केली जात आहे. जानेवारी महिन्यात पत्नी घर सोडून निघून गेली होती, त्यावेळी सीताराम यांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रारही दिली होती. सातत्याने होणारे वाद आणि अपमान यामुळे ते नैराश्यात होते.

Web Title : सॉफ्टवेयर इंजीनियर आत्महत्या: पत्नी के वीडियो से प्रेम बनाम वासना का सवाल।

Web Summary : हैदराबाद के सॉफ्टवेयर इंजीनियर सीताराम रेड्डी ने पत्नी के कथित संबंधों और लीक हुए वीडियो के कारण आत्महत्या कर ली। एक सुसाइड नोट में प्रेम बनाम वासना पर सवाल उठाते हुए उनका दुख व्यक्त हुआ। पत्नी और उसका प्रेमी गिरफ्तार; पुलिस जांच कर रही है।

Web Title : Software engineer suicide: Wife's videos spark tragic love vs. lust question.

Web Summary : Hyderabad software engineer Sitaram Reddy committed suicide due to his wife's alleged affairs and leaked videos. A suicide note revealed his distress, questioning love versus lust. The wife and her lover have been arrested; police are investigating the matter.