शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

शिवडी कोळीवाड्यात सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 20:16 IST

उपचारासाठी केईएम रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना चक्कर आली.

ठळक मुद्देघरामध्ये सर्प आढळून आल्याची माहिती मिळताच सर्प पकडण्यासाठी सर्पमित्र राजू सोळंखी घटनास्थळी दाखल झाले. ही घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.  केईएम रूग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

- सागर नेवरेकरमुंबई - शिवडी कोळीवाड्यामध्ये एका राहत्या घरी नाग सर्प आढळून आला. शाहनबाज शेख यांच्या घरी हा सर्प शिरला होता. अंदाजे एक फुटाचा नाग होता. सर्पाला पकडताना सर्पमित्र राजू सोलंकी (२०) यांना सर्पदंश झाला. उपचारासाठी केईएम रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. 

घरामध्ये सर्प आढळून आल्याची माहिती मिळताच सर्प पकडण्यासाठी सर्पमित्र राजू सोळंखी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सर्पाला सुखरूप पकडण्यात आले. परंतु पकडलेला सर्प प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरताना सर्पाने उलट्या दिशेने फिरून राजू सोलंकी यांच्या उजव्या हाताच्या बोटावर दंश केला. ही घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. 

राजू यांना सर्प चावला असतानाही त्यांनी हातातले काम सोडले नाही. त्याने सर्पाला बाटलीमध्ये भरून घेऊन गेला. सापडलेला सर्प हा मोठा नसून छोटे पिल्लू होते. त्यामुळे मला काही होणार नाही, असेही राजू सोलंकी यांनी तेथील नागरिकांना सांगितले. परंतु सर्पदंश झालेला हात जास्तच सुजला होता. राजू यांनी त्वरीत केईएम रूग्णालय गाठले. रूग्णालयात त्यांना चक्कर आली आणि जमिनीवर कोसळला. यावेळी केईएम रूग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

टॅग्स :snakeसापDeathमृत्यूKEM Hospitalकेईएम रुग्णालय