शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:39 IST

१५०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रविंद्र नाथ सोनी या मास्टरमाईंडने स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) समोर आता नवीन नाटक केलं आहे.

१५०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रविंद्र नाथ सोनी या मास्टरमाईंडने स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम (SIT) समोर आता नवीन नाटक केलं आहे. "साहेब, मी दुबईत कचोरी विकून कसंतरी कुटुंबाचं पोट भरतो. कुटुंब चालवणंही अवघड झालं होतं" असं सुरुवातीच्या चौकशीत हात जोडत म्हटलं आहे. पण SIT ला त्याच्या या दाव्यावर अजिबात विश्वास बसला नाही. कारण टेबलवर बँक स्टेटमेंट, गुंतवणुकीची कागदपत्रं, गुंतवणूकदारांच्या तक्रारी आणि विदेशी बँक अकाऊंटचे डिटेल्स यांचा ढिग पडला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ADCP क्राईम अंजली विश्वकर्मा यांच्या टीमने सोनीसमोर त्याच्या कंपन्यांची रजिस्ट्रेशन, विदेशी फंडिंग आणि बँक अकाऊंटचे डिटेल्स ठेवले. गेल्या सात वर्षांपासून तो याच कंपन्यांचा वापर करून लोकांना जास्त परताव्याचे आमिष दाखवत होता. चौकशीदरम्यान, SIT ने सोनीला त्याच्या हाय-प्रोफाइल संबंधांबाबत प्रश्न विचारले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो ज्या व्हिडीओंचा वापर करत होता, ते अभिनेता आणि रेसलर यांच्यासोबतचे व्हि़डीओ होते.

दुबईतून पळून थेट डेहराडूनला पोहोचला

सोनीने कबूल केलं की, कंपनीत अनेक संचालक होते आणि वेळोवेळी सर्वजण आपापल्या वाट्याचे पैसे काढून घेत होते. गुंतवणूकदारांचा दबाव वाढल्यावर तो घाबरला आणि दुबईतून पळून थेट डेहराडूनला पोहोचला. सोनी स्वतःला गरीब दाखवण्याचा कितीही प्रयत्न करत असला तरी त्याचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, बिझनेस कार्ड्स आणि ईमेल ट्रेल काहीतरी वेगळीच गोष्ट सांगत होते. त्याचे दुबईतील कार्यालय लाखो डॉलर्सच्या व्यवहारांचे केंद्र होतं. तो विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पंचतारांकित हॉटेल्समध्ये आकर्षक कार्यक्रम आयोजित करायचा, जेणेकरून कंपनीला ग्लोबल ब्रँड'च असल्याची ओळख मिळेल.

कानपूरमध्ये झाली अटक

मुख्य कंपनी 'ब्लूचिप कमर्शियल ब्रोकर' २०१८ पासून सक्रिय होती आणि याद्वारेच विदेशी गुंतवणूकदारांचे पैसे रिअल इस्टेट व गोल्ड मायनिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फिरवले जात होते. सोनीच्या दुबईतून पळून जाण्याची गोष्ट तर एखाद्या फिल्मी गोष्टीपेक्षा कमी नाही. दुबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये त्याने देश सोडल्याची कोणतीही नोंद नव्हती. त्याने एका तस्करांच्या टोळीच्या मदतीने ओमानमध्ये प्रवेश केला आणि तिथून भारतात विमानाने डेहराडून गाठलं. स्थानिक गुंतवणूकदारांनी दुबई पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की सोनी देश सोडून जाऊच शकत नाही. पण काही दिवसांनी कानपूरमधून त्याच्या अटकेची बातमी आली आणि सगळेच चक्रावून गेले.

७०० हून अधिक लोकांची कोट्यवधींची फसवणूक

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनीच्या कमीत कमी १६ कंपन्या रजिस्टर होत्या. त्यातील बऱ्याच कंपन्या वेगवेगळ्या नावांवर आणि प्रमोटर्सवर होत्या, जेणेकरून एका कंपनीची चौकशी झाल्यास संपूर्ण नेटवर्क धोक्यात येऊ नये. कानपूरचे पोलीस आयुक्त रघुबीर लाल यांनी माहिती दिली की, आतापर्यंत ७०० हून अधिक लोक या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. सुमारे ९०% फसवणूक झालेले लोक भारतीय असून उर्वरित नेपाळ, चीन, जपान, अमेरिका आणि फ्रान्ससारख्या देशांतील आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kachori Seller? Fraudster's New Act in ₹1500 Crore Scam Unveiled

Web Summary : Ravindra Nath Soni, accused of a ₹1500 crore fraud, claims poverty, selling kachoris in Dubai. SIT investigations reveal a network of companies, foreign investments, and high-profile connections. He fled Dubai via smugglers after investor pressure, but electronic evidence tells a different story, exposing global operations.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMONEYपैसाArrestअटक