१२ फेब्रुवारीला लग्न, ८ मार्चला पतीची हत्या... २ मुलांच्या बापाशी अफेअर, 'तिने' रचला भयंकर कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:59 IST2026-03-11T17:59:09+5:302026-03-11T17:59:50+5:30

उमा बैश्य हिचं लग्न १२ फेब्रुवारी २०२६ रोजी अजय वैश्य याच्याशी झालं होतं. मात्र उमा या लग्नामुळे खूश नव्हती.

singrauli murder case wife uma lover killed husband ajay instagram affair | १२ फेब्रुवारीला लग्न, ८ मार्चला पतीची हत्या... २ मुलांच्या बापाशी अफेअर, 'तिने' रचला भयंकर कट

१२ फेब्रुवारीला लग्न, ८ मार्चला पतीची हत्या... २ मुलांच्या बापाशी अफेअर, 'तिने' रचला भयंकर कट

सिंगरौली जिल्ह्यातील रजनिया कटरा येथील जंगलात ८ मार्च रोजी सापडलेल्या अजय बैश्य याच्या मृतदेहाचं गूढ आता उकललं आहे. हा कोणताही अपघात नसून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हत्या होती. या हत्येची मास्टरमाईंड मृताची पत्नी उमा निघाली असून तिने आपला प्रियकर अमर बहादूर याच्या मदतीने हा भयानक कट रचला होता.

सरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. उमा बैश्य हिचं लग्न १२ फेब्रुवारी २०२६ रोजी अजय वैश्य याच्याशी झालं होतं. मात्र उमा या लग्नामुळे खूश नव्हती. तिचं अमर बहादुर बैश्य नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते, ज्याच्याशी तिची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. अमर बहादूर हा आधीच विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत, तरीही उमा त्याच्यासाठी स्वतःचा संसार उद्ध्वस्त करायला तयार होती.

उमाने पती अजयला फोन करून माहेरी भेटायला बोलावलं. अजय आपल्या बाईकवरून सासरच्या घरी जाण्यासाठी निघाला, पण उमा प्रत्येक लोकेशन आपला प्रियकर अमर बहादूर आणि त्याचा मित्र चंद्र बहादूर यांना देत होती.

ठरलेल्या कटानुसार, रजनियाच्या जंगलात बोलेरोमधून आलेल्या प्रियकर आणि त्याच्या साथीदाराने अजयला रस्त्यात अडवलं. सुरुवातीला काही बहाण्याने अजयला मारहाण करण्यात आली, त्यानंतर हातमोजे घालून गळा आवळून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर पोलिसांना हा अपघात वाटावा यासाठी आरोपींनी मृतदेहावर त्याची बाईक फेकून दिली.

अजयचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी जेव्हा पत्नी उमाचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा तिचे अमर बहादूरशी तासनतास बोलणं होत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता उमा आणि तिच्या प्रियकराने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नी उमा वैश्य, प्रियकर अमर बहादूर आणि साथीदार चंद्रप्रकाश यांना अटक करून न्यायालयात हजर केलं.

Web Title : शादी के कुछ हफ़्तों बाद पत्नी ने प्रेमी संग पति का कत्ल किया।

Web Summary : एक महिला ने शादी के कुछ हफ़्तों बाद अपने प्रेमी के साथ मिलकर पति की हत्या की साजिश रची। अफेयर के चलते, उसने और उसके साथी ने इसे दुर्घटना दिखाने की कोशिश की। पुलिस जांच में सच्चाई सामने आने पर गिरफ्तारियां हुईं।

Web Title : Wife plots husband's murder weeks after wedding, affair exposed.

Web Summary : A woman orchestrated her husband's murder with her lover weeks after their wedding. Driven by an affair, she and her accomplice staged it as an accident. Police investigation revealed the truth, leading to arrests.