शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी निवडला शॉर्टकट, तरुणाला लुटण्यासाठी केला गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 20:43 IST

Crime News : तरुणावर गोळीबार करणारे चार आरोपी खारघर पोलिसांच्या ताब्यात

ठळक मुद्दे         विपीन ठाकूर (19),गोपाळ सिंग (23),अभिनंदन शर्मा (23), मुलच ठाकुर (23) अशी या चारही आरोपींची नावे आहेत.

वैभव गायकर 

पनवेल :खारघर शहरातील सेक्टर 11 परिसरातील पाण्याच्या पाईप लाईनजवळील झोपडपट्टी जवळ प्रतीक रविंद्र आहेर (वय 24) या तरुणावर गोळीबार झाल्याची घटना शनिवारी रात्री 11 च्या सुमारास घडली .या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे.या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून आरोपी चौघा तरुणांना खारघर पोलिसांनी कोपरा गावातून अटक केली आहे.         

विपीन ठाकूर (19),गोपाळ सिंग (23),अभिनंदन शर्मा (23), मुलच ठाकुर (23) अशी या चारही आरोपींची नावे आहेत.चारही जण काही दिवसापूर्वी कोपरा गावात भाड्याच्या खोलीत वास्तव्याला आले होते.घटनेच्या वेळेस कोपरा गावाजवळील सीसीटीव्ही तपासले असता चारही जण कोपरा गावात शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाले असता त्यादिशेने तपास केल्यावर रविवारी या आरोपीना जेरबंद करण्यात आल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.

आरोपीकडून अग्निशस्त्र व जिवंत काडतूडे जप्त करण्यात आले आहेत.पेणमध्ये राहणारा हा तरुण इस्टेट एजंट चा व्यवसाय करणारा प्रतीक त्याच्या दुचाकीने (क्र. एम.एच झिरो 06 बी.एच 6399) खारघर याठिकाणी फिरण्यासाठी आलेला होता. रात्री 11 च्या दरम्यान वाशी येथून सायन पनवेल महामार्गाने पनवेलकडे जाताना कोपरा  गाव बस स्टॉपच्या मागील रोडवर सिगरेट पीत असताना त्या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्तींनी त्याच्याकडे मोबाईल, पैसे व दुचाकीची मागणी केली. मात्र, प्रतिक यांने यास विरोध केल्याने एकाने जबरदस्तीने त्याच्यापासून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता एका आरोपीने प्रतिकच्या डाव्या पायाच्या मांडीवर गोळी झाडली होती.या आरोपीना काही तासातच अटक करून बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या या गँगच्या मुसक्या आवळण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक बिडवे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक पढार,मानसिंग पाटील ,नरेंद्र बेलदार आदींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाने हि कामगिरी बजावली.हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी निवडला शॉर्टकट पोलिसांनी आरोपींना लुटमारीचे कारण विचारले असता नव्याने हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी हा लुटमारीचा पर्याय निवडला असल्याचे या आरोपींनी कबूल केले.या लुटमारीच्या पैशातून हॉटेल सुरु करण्याचा विचार या आरोपींचा होता अशी माहिती तपासात उघड झाली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.  

टॅग्स :FiringगोळीबारArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसhotelहॉटेल