धक्कादायक! घरात घुसून तरुणीची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 23:30 IST2019-11-12T23:29:54+5:302019-11-12T23:30:04+5:30

याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Shocking! Young woman murdered in house | धक्कादायक! घरात घुसून तरुणीची केली हत्या

धक्कादायक! घरात घुसून तरुणीची केली हत्या

डोंबिवली - पूर्वेतील सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीची हत्या करणाऱ्याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

सुनिलनगर परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये राहणारी ऐश्वर्या देशपांडे (१९) ही तरुणी घरात एकटीच असल्याचे पाहून त्याच परिसरात राहणारा दीपक भणगे (२९) सोमवारी सायंकाळी सात च्या सुमारास तिच्या घरात घुसला. नशेच्या आहारी असलेल्या दिपकने ऐश्वर्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्याच्या रागातून दिपकने गळा दाबून तिची हत्या केली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी मंगळवारी दुपारी ऐश्वर्याची हत्या करणाऱ्या दिपकला अटक केली. नशेत असलेल्या दिपकने ऐश्वर्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्याच्या रागातून दिपकने तिची हत्या केल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली.

Web Title: Shocking! Young woman murdered in house