शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! इन्स्टाग्रामवर विद्यार्थिनींचे अश्लील फोटो टाकून धमकाविणाऱ्या तरुणाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 21:39 IST

दोन मुलींना धमकावल्याचे तपासात पुढे आले आहे.

ठळक मुद्देफोटो अपलोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर कॉलेजमधील विद्यार्थिनींचे अश्लील फोटो टाकून धमकावण्याचे काम अक्षत करायचा. अक्षतच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुंबई - इन्स्टाग्रामवर विद्यार्थिनींचे अश्लील फोटो टाकून धमकाविणाऱ्या १९ वर्षीय तरुणास लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अक्षत दोशी असं या तरुणाचं नाव आहे. फोटो अपलोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर कॉलेजमधील विद्यार्थिनींचे अश्लील फोटो टाकून धमकावण्याचे काम अक्षत करायचा. दोन मुलींना धमकावल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दक्षिण मुंबईतील एका नामांकित कॉलेजात शिक्षणारा आरोपी अक्षत हा टी.वाय.बी. कॉमचे शिक्षण घेत आहे. अक्षत हा इन्स्टाग्रामवर पीडित तरुणीचे वारंवार फोटो पहायाचा. एकदा त्याने पीडित तरुणीला इन्स्टाग्रामच्या बनावट खात्यावरून मेसेज करत, पीडितेचा चेहरा वापरून अश्लील व्हिडिओ क्लिप तिला पाठवली. त्यानंतर त्याने पीडितेला मी जे सांगेल तसे करायचे असं सांगून धमकावले. बदनामीच्या भितीने पीडित तरुणीने अक्षत जे सांगेल तसे करत होती. अक्षतने तरुणीच्या नावाने बनावट खाते उघडून त्याद्वारे तो इन्स्टाग्रावरील तरुणांशी अश्लील संभाषण करायचा. अक्षतच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा गुन्हा वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या तपासासाठी वर्ग केला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिकदृष्या तपास करून अक्षतला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल  पोलिसांनी तपासला असता त्याने अशा प्रकारे इतर दोन महिलांना ही जाळ्यात ओढले होते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकInstagramइन्स्टाग्रामPoliceपोलिसMumbaiमुंबई