शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गस्तीवर असलेल्या पोलीसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 15:43 IST

पालक आणि नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलीस हवालदारावर कुरार पोलीस ठाण्यात पाॅक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. अटक पोलिसाचं नाव एस. परब असं आहे. 

ठळक मुद्देपरब हा मालाडच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या अदानी इलेक्ट्रिकसिटी कार्यालयासमोर असणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनवर कार्यरत होता. कुरार पोलिसांनी परबवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

 

मुंबई - नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस शहरभर गस्तीवर असतात. मात्र, मालाड येथे गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदाराने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पालक आणि नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलीस हवालदारावर कुरार पोलीस ठाण्यात पाॅक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. अटकपोलिसाचं नाव एस. परब असं आहे. 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परब हा मालाडच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या अदानी इलेक्ट्रिकसिटी कार्यालयासमोर असणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनवर कार्यरत होता. पीडित मुलगी ही कुरार परिसरात राहते. रोज शाळेतून येता - जाता परब हा पूजाला पाहून अश्लील शेरेबाजी करायचा. मात्र पूजा दुर्लक्ष करायची. सोमवारी ती शाळेत निघाली असताना परबने तिला आपल्याकडे बोलावले. पूजा त्याच्याजवळ गेली तेव्हा त्याने तिला घट्ट पकडले. त्याने पूजा घाबरली व आरडाओरड करत तिने तिथून घरी पळ काढला. तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. संतप्त पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात फोन करत तक्रार केली. पूजाचे पालक, शेजाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गोंधळ घातला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घातल्यावर कुरार पोलिसांनी परबवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. परबची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसArrestअटकSchoolशाळा