शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

अर्णब गोस्वामींना तळोजाला हलविण्यामागे वेगळेच कारण; तपास अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

By हेमंत बावकर | Published: November 08, 2020 8:03 PM

Arnab Goswami News: गोस्वामींना अलिबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेत आरोपींसाठी बनविण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

मुंबई : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. याच्या मागे त्यांची सुरक्षा कारणीभूत नसून गोस्वामींनी अलिबागच्या शाळेत बनविलेल्या सब जेलमध्ये मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केल्याचे समोर आले आहे. 

गोस्वामींना अलिबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेत आरोपींसाठी बनविण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तळोजा जेलमध्ये नेत असताना गोस्वामी यांनी पोलीस व्हॅनच्या खिडकीतून ओरडत शनिवारी अलिबाग जेलरनी मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच जबरदस्तीने तळोजा जेलमध्ये नेण्यात येत असून माझ्या जिवाला धोका असल्याची ओरड मारली. तसेच न्यायालयाला माझी मदत करण्यास सांगा, असेही गोस्वामी बोलले. 

नाईक आत्महत्या प्रकरणाच तपास करणारे पोलीस अधिकारी जमील शेख यांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी अर्णब गोस्वामी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे समजले. ते दुसऱ्या कोणाचातरी फोन वापरत होते. आम्ही त्यांचा फोन आधीच जप्त केला आहे. या प्रकारानंतर गोस्वामींकडे हा फोन कसा आला याचा तपासणी अहवाल लिहिण्याचे पत्र तुरुंग अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. या अहवालानुसार आम्ही गोस्वामी यांना तळोजा जेलमध्ये हलविले. 

दरम्यान, माझ्या जीवाला धोका आहे. अटकेत असताना मला मारहाण करण्यात आली. मला माझ्या वकिलांसोबत बोलू दिले जात नाही आहे, असा आरोप रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.

नारायण राणेंकडून गोस्वामींची पाठराखणनारायण राणेंनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर बाण चालवले आहेत. 'अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका झाल्‍यास, त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल.', असे ट्विट नारायण राणेंनी केलंय. 

पोलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर ९ नाव्हेंबरला सुनावणीअन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. या प्रकरणी आता सोमवारी, ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला रायगड पोलिसांनी रायगडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतची सुनावणी शनिवारी पार पडली. सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश कोर्टात दाखल झाले आणि सुनावणीला सुरुवात झाली.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnvay Naikअन्वय नाईकSuicideआत्महत्याPoliceपोलिसjailतुरुंग