शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:35 IST

हे रॅकेट बर्‍याच दिवसांपासून पोलिसांना खबर न लागू देता अत्यंत नियोजित पद्धतीने चालविले जात होते.

ठळक मुद्देएक महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती महिला आणि मुलींना पैशाचे आमिष दाखवून गाझियाबाद येथे आणायची आणि नंतर त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात काम करण्यास भाग पाडत असे.

गाझियाबाद - व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात गाझियाबाद पोलिसांना यश आलं आहे. हे प्रकरण साहिबाबादच्या शालीमार गार्डन परिसरातील आहे. पोलिसांनी विक्रम एन्क्लेव्हमधील फ्लॅटवर छापा टाकून तब्बल १५ जणांना अटक केली आहे. यामध्ये ८ मुली आणि ७ मुलांचा समावेश आहेत. हे रॅकेट बर्‍याच दिवसांपासून पोलिसांना खबर न लागू देता अत्यंत नियोजित पद्धतीने चालविले जात होते.

एक महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती महिला आणि मुलींना पैशाचे आमिष दाखवून गाझियाबाद येथे आणायची आणि नंतर त्यांना देहविक्रीच्या व्यवसायात काम करण्यास भाग पाडत असे. दिल्ली आणि गाझियाबादमधील हॉटेलमधील मागणीनुसार नंतर त्यांना पाठवायची. हे रॅकेट सोशल मीडिया आणि व्हॉट्स अ‍ॅपद्वारे चालवण्यात येत होत. हे लोक आधी या सोशल मीडिया आणि व्हॉट्स अ‍ॅपवरुन आपल्या ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवत असत. नंतर ग्राहकांच्या आवडीनुसार मुलींना ग्राहकांजवळ पाठवले जात असे. शालिमार गार्डनमधील एका कॉम्पलेक्समधून हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. देहविक्री करणाऱ्या मुलींना त्या परिसरातील फ्लॅटमध्ये ठेवण्यात आले होते. येथे ग्राहक येत असत नाहीतर त्या मुलींना मागणीनुसार हॉटेलवर पाठवले जात असे. अटक करण्यात आलेल्या मुली या पंजाब, उत्तराखंड आणि इतर राज्यातील आहेत. हे सेक्स रॅकेट एक महिला चालवत होती. तिने पोलिसांना चौकशीदरम्यान पतीच्या मृत्यूनंतर आपलं पोट भरण्यासाठी ती हा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. ही महिला दर ६ महिन्यांनी आपला फ्लॅट बदलत असे जेणेकरुन पोलिसांच्या जाळ्यात आपण अडकू नये. तसेच ही आरोपी महिला घरमालकाला फ्लॅटचे भाडेही तीन पट अधिक देत असल्याचं चौकशीत उघड झालं.  मुलींना ग्राहकाकडे पाठवायला एका गाडीचीही व्यवस्था करण्यात येत असे. एका ग्राहकाकडून १० ते २५ हजार रुपये घेतले जात असत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : महेश भट्ट यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नोंदवला जबाब

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

 

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसArrestअटकProstitutionवेश्याव्यवसाय