school girl love with pubg partner reached punjab from indore | PUBG खेळता खेळता 'ती' प्रेमात पडली, पार्टनरसाठी घर सोडलं अन्...

PUBG खेळता खेळता 'ती' प्रेमात पडली, पार्टनरसाठी घर सोडलं अन्...

इंदूर - प्रेमासाठी अनेकजण काहीही करायला तयार होतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घडली आहे. पबजी गेम खेळता खेळता एक अल्पवयीन मुलगी पार्टनरच्या प्रेमात पडली अन् त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने थेट घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. इंदूरमध्ये एक अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता मुलगी पंजाबमध्ये असल्याचं कळलं. पबजी पार्टनरच्या घरी ती सापडली. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती पंजाबला गेल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या मल्हारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबाने 31 ऑगस्टला आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर तपास सुरू केला. मुलगी नेहमी पबजी खेळायची. मित्राचा वाढदिवस असून त्यासाठी पंजाबला जाणार असल्याचे ती बोलल्याची माहिती तिच्या आईने पोलिसांना दिली. 

दीड वर्षांपासून दोघे एकत्रित खेळत होते पबजी 

कुटुंबीयांनी मुलीला पंजाबला जाऊ दिलं नाही. त्यामुळे कदाचित मुलगी आता पंजाबला गेली असावी अशी शक्यता कुटुंबीयांनी पोलिसांकडे व्यक्त केली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे तिच्या मोबाईलचे लोकेशन शोधले. तेव्हा ती अमृतसरला असल्याची माहिती मिळाली. पोलीस अमृतसरला गेले तेव्हा ती पबजी पार्टनरच्या घरी होती. इंदूर पोलीस दोघांनाही घेऊन शहरात आले. गेल्या दीड वर्षांपासून ते दोघे एकत्रित पबजी खेळत होते. 

त्याला भेटण्यासाठी 'ती' विमानाने गेली मुंबईला 

पबजी खेळता खेळता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 9 सप्टेंबरला पबजी पार्टनरचा वाढदिवस असल्याचं मुलीने पोलिसांना सांगितलं. अल्पवयीन मुलगी मित्राला भेटण्यासाठी विमानाने व इंदूरहून मुंबईला गेली. त्यानंतर दोघे तेथून अमृतसरला गेले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. तर मित्राला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवताहेत; सरकारचा कृषि विरोधी काळा कायदा"

भयंकर! मुलाच्या हव्यासापायी पतीने गर्भवती पत्नीच्या पोटावर केले वार

"मोदी सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, ...मात्र एकही उत्तर नाही", काँग्रेसचा हल्लाबोल

धक्कादायक! कैद्याच्या शरीरात सापडले 4 फोन, प्रशासनात खळबळ

CoronaVirus News : आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

Web Title: school girl love with pubg partner reached punjab from indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.