Police Arrests Father Ripping-open Pregnant Wife's Stomach to 'See if Fetus was Male' | भयंकर! मुलाच्या हव्यासापायी पतीने गर्भवती पत्नीच्या पोटावर केले वार

भयंकर! मुलाच्या हव्यासापायी पतीने गर्भवती पत्नीच्या पोटावर केले वार

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशाच एक भयंकर प्रकार हा उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. मुलाच्या हव्यासापायी एका पतीने आपल्या गर्भवती पत्नीच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या पोटात मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यासाठी पतीने अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

पत्नीच्या पोटात मुलगा आहे का? हे पाहण्यासाठी केला भयंकर प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, पन्नालाल असं आरोपी पतीचं नाव असून त्याला पाच मुली आहेत. त्यामुळेच यावेळी मुलगा हवा म्हणून पन्नालालने आपल्या 35 वर्षीय पत्नीच्या पोटावर शस्त्राने वार केले. पत्नीच्या पोटात मुलगा आहे का? हे पाहण्यासाठी त्याने भयंकर प्रकार केला आहे. यामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. स्थानिकांनी तातडीने महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला बरेली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी महिला सहा ते सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती दिली आहे. 

पोलिसांनी केली आरोपीला अटक

पोलीस अधिकारी प्रविण सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिविल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेकपूर या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला याआधी मुली आहेत. मात्र यावेळी मुलगा हवा असल्याने त्याने हे भयंकर कृत्य केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

धक्कादायक! कैद्याच्या शरीरात सापडले 4 फोन, प्रशासनात खळबळ

राजस्थानच्या जोधपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात असलेल्या एका 32 वर्षीय कैद्याने आपल्या मलाशयात तब्बल चार मोबाईल लपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील कारागृहात असलेल्या एका कैद्याच्या पोटात अचानक दुखू लागले. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक, मुंबईतील 'या' 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

"मोदी सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, ...मात्र एकही उत्तर नाही", काँग्रेसचा हल्लाबोल

धक्कादायक! कैद्याच्या शरीरात सापडले 4 फोन, प्रशासनात खळबळ

CoronaVirus News : आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाच्या संकटात 'या' शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी घरासमोरच आणली 'शाळा'

Web Title: Police Arrests Father Ripping-open Pregnant Wife's Stomach to 'See if Fetus was Male'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.