"मोदी सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, ...मात्र एकही उत्तर नाही", काँग्रेसचा हल्लाबोल

By सायली शिर्के | Published: September 20, 2020 12:20 PM2020-09-20T12:20:07+5:302020-09-20T12:35:03+5:30

तीन कृषि विधेयके मोदी सरकार आज राज्यसभेत मांडणार आहे. याच दरम्यान विधेयकावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

congress randeep surjewala slams modi government over agriculture | "मोदी सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, ...मात्र एकही उत्तर नाही", काँग्रेसचा हल्लाबोल

"मोदी सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, ...मात्र एकही उत्तर नाही", काँग्रेसचा हल्लाबोल

Next

नवी दिल्ली - कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे राजीनामा सुपूर्द केला, असे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांचे प्रधान सचिव हरचरण बैन्स यांनी सांगितले. कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकांच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल मोदी सरकारचा राजीनामा देतील, अशी घोषणा सुखबीर सिंग बादल यांनी गुरुवारी लोकसभेत केल्यानंतर हरसिमरत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

तीन कृषि विधेयके मोदी सरकार आज राज्यसभेत मांडणार आहे. याच दरम्यान विधेयकावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरून निशाणा साधला आहे. विधेयकावरून काँग्रेसने सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत. मोदी सरकार आणत असलेले तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी "शेतकरी विरोधी तीन काळे कायदे भाजपा पक्षादेश (व्हिप) काढून मंजूर करेल, पण त्यांच्याकडे एकही उत्तर नाही" असं म्हटलं आहे. 

रणदीप सुरजेवाला यांनी केलं ट्विट, म्हणाले...

रणदीप सुरजेवाला यांनी रविवारी (20 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मोदी सरकार शेतकरी विरोधी तीन काळे कायदे पक्षादेश जारी करून मंजूर करणार आहे. मात्र त्यांच्याकडे एकही उत्तर नाही. 15.50 कोटी शेतकऱ्यांना एमएसपी कसा मिळेल, तो कोण देणार?, सरकार एमएसपीची कायदेशीर जबाबदारी देण्यापासून का पळत आहे?, बाजार समित्यांच्या बाहेर एमएसपीची मिळण्याची जबाबदारी कोण घेणार?" असे तीन प्रश्न रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केले आहेत.

कृषी विधेयकावरून रालोआने फसविले; अकालीची भावना

मोदी सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा विधेयकामुळे शिरोमणी अकाली दलाच्या मनात राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ) फसविले गेल्याची भावना आहे, असे पक्षाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत बादल यांनी सांगितले की, या विधेयकामुळे देशाचे संघीय संरचना आणि पंजाबची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. बादल यांनी सांगितले की, कृषी विधेयकामुळे मी दु:खी झालो आहे. काँग्रेसच्या शेतकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी रालोआची स्थापना करण्यात आली होती. माझे वडील सरदार प्रकाशसिंग बादल हे त्याचे संस्थापक सदस्य होते. काँग्रेसच्या धोरणांना विरोध केल्यामुळे माझ्या वडिलांना तिहारच्या तुरुंगात डांबण्यात आले होते. तेथूनच याची खरी सुरुवात झाली होती. हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, याचा अर्थ अकाली दल-भाजपची युती संपली असा होतो का, या प्रश्नावर बादल यांनी सांगितले की, आमच्या पक्षाची गाभा समिती परिस्थितीचे आकलन करून यावर योग्य तो निर्णय घेईल. दुर्दैवाने, कृषी अध्यादेश आणताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. आमच्या पक्षात रालोआकडून फसविले गेल्याची भावना आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! कैद्याच्या शरीरात सापडले 4 फोन, प्रशासनात खळबळ

CoronaVirus News : आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाच्या संकटात 'या' शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी घरासमोरच आणली 'शाळा'

CoronaVirus News : आनंदाची बातमी! प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा

"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला", शेलारांचा टोला

Web Title: congress randeep surjewala slams modi government over agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.