bjp ashish shelar slams Shivsena over queen necklace mumbai | "शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला", शेलारांचा टोला

"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला", शेलारांचा टोला

मुंबई - भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे. 'आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप?, झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड?, आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ट्विटरवरून त्यांनी हल्लाबोल केला आहे. 

आशिष शेलार यांनी शनिवारी (19 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केलं आहे. "केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्विन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण.. आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय?" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

"आता पारसी गेट तोडलाच...समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार...परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य?, आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप?, झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या "ढोंगीपणाचा गाळ" दिसला ना!" असं ट्विट शेलार यांनी केलं आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. 

"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"

"मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?" असं शेलार यांनी म्हटलं होतं. "मुंबई बाँम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. वा रे वा! विवेकबुध्दी गहाण ठेवली काय?, हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?" असं शेलार यांनी म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

बलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय 

Video - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी

मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट

कुत्र्यावरून दोन गटात तुफान 'राडा', अनेकजण जखमी; गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात 

Web Title: bjp ashish shelar slams Shivsena over queen necklace mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.