congress rahul gandhi twitter reaction on farm bills slams pm modi | "मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवताहेत; सरकारचा कृषि विरोधी काळा कायदा"

"मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवताहेत; सरकारचा कृषि विरोधी काळा कायदा"

नवी दिल्ली - विरोधकांच्या प्रचंड गदारोळात राज्यसभेत कृषीविषयक विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी या दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत विधेयके मांडली होती. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी विधेयकांना तीव्र विरोध केला. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

राज्यसभेत कृषि विषयक विधेयकावर गदारोळ सुरू असताना राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. शेतकऱ्यांना गुलाम बनवलं जात असल्याचं म्हणत राहुल यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच मोदी सरकारचा कृषि विरोधी काळा कायदा असल्याचं सांगत दोन प्रश्न उपस्थित केले आहे. यासोबतच KisanVirodhiNarendraModi हा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला आहे. 

"मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवताहेत"

"मोदी सरकारच्या कृषि विरोधी काळ्या कायद्यांमुळे शेतकरी बाजार नष्ट होतील, मग एमएसपी कशी मिळणार?, एमएसपीची खात्री का नाही? मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहे. पण देश हे कधीही यशस्वी होऊ देणार नाही" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तर दुसरीकडे आवाजी मतदान घेत विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. हे दोन्ही कायदे ऐतिहासिक असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणतील. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील असं नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे. 

"मोदी सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, ...मात्र एकही उत्तर नाही" 

विधेयकावरून काँग्रेसने सरकारला याआधी तीन प्रश्न विचारले होते. मोदी सरकार आणत असलेले तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असल्याची टीका काँग्रेसने केली होती. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी "शेतकरी विरोधी तीन काळे कायदे भाजपा पक्षादेश (व्हिप) काढून मंजूर करेल, पण त्यांच्याकडे एकही उत्तर नाही" असं म्हटलं होतं. रणदीप सुरजेवाला यांनी रविवारी (20 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं. 

काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल 

"मोदी सरकार शेतकरी विरोधी तीन काळे कायदे पक्षादेश जारी करून मंजूर करणार आहे. मात्र त्यांच्याकडे एकही उत्तर नाही. 15.50 कोटी शेतकऱ्यांना एमएसपी कसा मिळेल, तो कोण देणार?, सरकार एमएसपीची कायदेशीर जबाबदारी देण्यापासून का पळत आहे?, बाजार समित्यांच्या बाहेर एमएसपीची मिळण्याची जबाबदारी कोण घेणार?" असे तीन प्रश्न रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

भयंकर! मुलाच्या हव्यासापायी पतीने गर्भवती पत्नीच्या पोटावर केले वार

Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक, मुंबईतील 'या' 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

"मोदी सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, ...मात्र एकही उत्तर नाही", काँग्रेसचा हल्लाबोल

धक्कादायक! कैद्याच्या शरीरात सापडले 4 फोन, प्रशासनात खळबळ

CoronaVirus News : आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

English summary :
congress rahul gandhi twitter reaction on farm bills slams pm modi

Web Title: congress rahul gandhi twitter reaction on farm bills slams pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.