बॉम्ब सदृश्य वस्तू निघाली एक फटाका; नाशिकमध्ये उच्चभ्रू वस्तीत अज्ञात वस्तू आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 14:13 IST2021-03-02T14:12:02+5:302021-03-02T14:13:03+5:30

Crime News : बॉम्ब सदृश्य वस्तू नाशिकच्या निशांत अपार्टमेंट शरणपूर रोड या भागांमध्ये आढळून आल्याचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले. 

Scare over the found of a bomb-like object in a high-profile area in Nashik | बॉम्ब सदृश्य वस्तू निघाली एक फटाका; नाशिकमध्ये उच्चभ्रू वस्तीत अज्ञात वस्तू आढळल्याने खळबळ

बॉम्ब सदृश्य वस्तू निघाली एक फटाका; नाशिकमध्ये उच्चभ्रू वस्तीत अज्ञात वस्तू आढळल्याने खळबळ

ठळक मुद्देहि वस्तू कोणाच्या हातात फुटली असती तर त्या व्यक्तीच्या हाताला इजा झाली असती. बाकी काही गंभीर परिणाम झाले नसते असे  पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी पुढे सांगितले. 

नाशिक - कॉलेज रोडच्या लिंक रस्त्यावरील घटना उच्चभ्रू वस्तीत बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने पोलिसांची कुमक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने स्फोटक सदृश्य वस्तू नष्ट केल्यानंतर त्या खोट्यामधून एक प्लास्टिकचा लहान चेंडू आणि त्यामध्ये भरलेली फटाक्याची दारू आणि त्याला लावलेली वात अशा स्वरूपामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू नाशिकच्या निशांत अपार्टमेंट शरणपूर रोड या भागांमध्ये आढळून आल्याचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले. 

 

 

या बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचे धातू किंवा स्फोटक मिश्रित घटक नसल्याचा खुलासा बॉम्ब शोधक व नाशक पथकाने केला आहे. त्यामुळे या स्फोटक सदृश्य वस्तूची एका फटाकेपेक्षा जास्त काही तीव्रता नसल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे कृत्य कोणी केले याचा शोध आता पोलिस घेत आहेत. मात्र, हि वस्तू कोणाच्या हातात फुटली असती तर त्या व्यक्तीच्या हाताला इजा झाली असती. बाकी काही गंभीर परिणाम झाले नसते असे  पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी पुढे सांगितले. 

 

 

 जेथे ही वस्तू सापडली तेथे अनेक व्यापारी संकुलं आणि प्रतिष्ठितांचे बंगले असलेला हा परिसर आहे. पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी दाखल झाली तसेच बीडीडीएस पथक पोचलं आणि हा पूर्ण परिसर सील करण्यात आला होता. कचरा गोळा करणाऱ्यांना ही वस्तू सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच हे कोणतंही मॉक ड्रिल नसल्याचा पोलिसांनी खुलासा केला. 

Web Title: Scare over the found of a bomb-like object in a high-profile area in Nashik