शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

रिलेशनशीप, ब्लॅकमेलिंग अन् हत्या; काँग्रेस नेत्या हिमानी यांच्या हल्लेखोरांबाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 10:02 IST

हरयाणा येथील रोहतकमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत.

हरयाणा येथील काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांची हत्या झाली. त्यांचा मृतदेह सुटकेसमधून फेकून देण्यात आला. काल सोमवारी या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीचे नाव सचिन असं आहे. आरोपी बहादुरगड येथील राहणार आहे. हिमानी यांची हत्या त्याने त्याच्याच घरात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशाची लक्तरे वेशीवर टांगली! गुजरातच्या पटेलने अमेरिकेत जाण्यासाठी पाकिस्तानी बनण्यासही मागेपुढे पाहिले नाही

हिमानी यांचा मृतदेह ज्या सुटकेसमध्ये सापडला ती सुटकेस हिमानी यांच्या घरातील होती. हत्या करणारा तरुण हा  हिमानी यांचा ओळखीचा आहे. आरोपीकडून हिमानी यांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. सीआयए २ च्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हिमानी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होतो आणि ती ब्लॅकमेल करत होती. शिवाय, लाखो रुपयेही उकळण्यात आले होते, असा दावा त्या आरोपीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीची चौकशी सुरू असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तपासानंतरच हत्येमागील खरे कारण समोर येईल. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, "आम्ही आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहोत. पत्रकार परिषदेदरम्यान आम्ही  माहिती शेअर करू."

भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या

काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येनंतर मृतदेह सूटकेसमध्ये भरून फेकून देण्यात आला होता. हिमानी यांच्या आईने हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचा आरोप केला होता. हिमानी नरवाल गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत होत्या. त्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्येही सहभागी झाल्या होत्या.  भारत जोडो यात्रेदरम्यान, हिमानी यांचा राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटोही व्हायरल झाला आहे.

दरम्यान हिमानी नरवाल यांच्या भावाने प्रतिक्रिया दिली आहे.  भाऊ जतिन म्हणाला, "एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि आज आम्ही तिचे अंत्यसंस्कार करणार आहे. माध्यमांमध्ये खूप अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला न्याय मिळेल. आम्हाला अजूनही आरोपी कोण आहे हे माहित नाही, पोलिसांनी आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही. आम्हाला आरोपीला फाशीची शिक्षा हवी आहे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcongressकाँग्रेस