शहरं
Join us  
Trending Stories
1
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
2
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
5
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
6
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
9
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
10
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
11
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
12
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
13
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
14
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
15
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
16
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
19
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
20
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 20:51 IST

१० दिवसांपूर्वी प्रयागराज जंक्शनवरून एक तरुण आपल्या पत्नीसोबत गोव्याला जात असताना अचानक बेपत्ता झाला.

मध्य प्रदेशातील इंदूरच्या राजा रघुवंशीचे मेघालयात झालेले हत्याकांड अजूनही लोक विसरलेले नाहीत. हनीमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनम आणि तिच्या प्रियकराने सुपारी देऊन त्याची हत्या केली होती. अशीच एक धक्कादायक घटना आता उत्तर प्रदेशातीलप्रयागराज येथून समोर आली आहे. मात्र, येथे नशिबाने पती बचावला आणि परत घरी आला.

१० दिवसांपूर्वी प्रयागराज जंक्शनवरून एक तरुण आपल्या पत्नीसोबत गोव्याला जात असताना अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर, बेपत्ता तरुणाची पत्नी तिच्या माहेरी पोहोचली आणि नंतर पोलीस ठाण्यात जाऊन तिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र, तब्बल दहा दिवसांनी तो तरुण घरी परतला आणि त्यानंतर संपूर्ण कहाणीचे सत्य समोर आले.

गोव्यात काम करणारा तरुण अचानक झाला बेपत्ता
अचानक बेपत्ता झालेला आणि नंतर १० दिवसांनी परतलेला हा तरुण सरयामरेज पोलीस स्टेशन परिसरातील एका गावाचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणाचे लग्न तीन वर्षांपूर्वी सुरियावन पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील मुलीशी झाले होते. हा तरुण गोव्यात आपल्या वडिलांसोबत एका कंपनीत काम करतो. विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी या तरुणाची पत्नीही त्याच्यासोबत राहण्यासाठी गोव्यात गेली होती.

पत्नीच्या ओळखीच्या लोकांनी जंक्शनवर केले अपहरण
३ जून रोजी तो तरुण आपल्या पत्नीला सुरियानवा येथील तिच्या माहेरी घेऊन गेला. त्यानंतर ४ जून रोजी दोघेही गोव्याला जाण्यासाठी प्रयागराज जंक्शनवर पोहोचले. प्रयागराज जंक्शनवर ट्रेनमध्ये चढण्यापूर्वीच तो तरुण अचानक बेपत्ता झाला. तरुण बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी सरयामरेज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तरुण १० दिवसांनी घरी परतला, तेव्हा त्याने सांगितले की, त्याच्या पत्नीला ओळखणारे दोन तरुण जंक्शनवर आले होते. पत्नीसमोरच त्या ओळखीच्या लोकांनी त्याला मारहाण केली आणि कोलकात्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवून कोलकात्याला नेले. त्यांनी त्याच्या पत्नीला काहीही केले नाही, असे त्याने सांगितले. कोलकात्यामध्ये त्यांनी त्याचे अपहरण केले आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो कसा तरी त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाला आणि १३ जून रोजी घरी पोहोचला.

पोलिसांची भूमिका आणि पुढील तपास
तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी सरायमरेज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सरायमरेज पोलीस ठाण्याने मात्र तरुणाच्या कुटुंबीयांना सुरियावन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पत्नीच्या ओळखीच्या लोकांनी हे कृत्य का केले, यामागे नेमके काय कारण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPrayagrajप्रयागराजgoaगोवाhusband and wifeपती- जोडीदार