राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:17 IST2025-06-12T10:16:28+5:302025-06-12T10:17:12+5:30

Sonam Raghuvanshi, Raja Raghuvanshi Murder: सोनम कुठल्यातरी तिसऱ्याच व्यक्तीसोबत पळून जाणार होती असा पोलिसांना संशय आहे.

Raj Kushwaha is just a pawn Sonam raghuvanshi true love is someone else New twist in Raja Raghuvanshi murder case | राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

Sonam Raghuvanshi, Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांनी आतापर्यंत बरीच महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलिसांनी सोनम रघुवंशीसह पाच आरोपींना शिलाँग न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणात एक धक्कादायक अपडेट मिळाली आहे. एका वृत्तानुसार, राजाच्या हत्येत पाच नव्हे तर सहा जणांचा सहभाग होता. राजाच्या हत्येतील सर्व आरोपींमध्ये त्याची पत्नी सोनम, सोनमचा कथित बॉयफ्रेंड राज कुशवाह आणि तीन आरोपींचा समावेश आहे.  पोलिस या हत्येचा सर्व अँगलने तपास करत आहेत. तशातच आता सहाव्या व्यक्तीबद्दल गूढ निर्माण झाले आहे. कारण पोलिसांना आता सोनम आणि राज कुशवाह व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीवरही संशय येऊ लागला आहे.

वेगळ्याच व्यक्तीवर संशय

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, राज कुशवाह हा फक्त एक मोहरा होता. सोनमने राजाची हत्या करण्यासाठी त्याचा वापर केला. एकीकडे सोनम राज कुशवाहला हत्येचा मास्टरमाइंड म्हणत आहे तर दुसरीकडे राजच्या म्हणण्यानुसार सोनम हीच हत्येची मास्टरमाइंड आहे. याचदरम्यान, टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, सोनम ही या संपूर्ण प्रकरणाची खरी सूत्रधार आहे. राजचा वापर एका मोहऱ्यासारखा करण्यात आला आहे असे मानले जाते. सर्व आरोपींच्या चौकशीवर लक्ष ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोनमने या सर्वांना गोड बोलून फसवले आणि राजाला मारण्यासाठी त्यांचा वापर केला. तिने राज कुशवाहला देखील लग्नाचे आश्वासन दिले आणि इतरांना पैशाचे आमिष दाखवले. पण आता या हत्येच्या कटात एक वेगळाच व्यक्ती समाविष्ट असल्याची चर्चा रंगली आहे.

सोनमने तिसऱ्याच व्यक्तीसोबत पळून जाणार होती?

आतापर्यंत असे मानले जात होते की राज कुशवाह हा या संपूर्ण प्रकरणाचा खरा सूत्रधार आहे. त्याला सोनमचा प्रियकर म्हटले जात होते. पण सूत्रांच्या हवाल्याने अहवालात असे म्हटले आहे की या प्रकरणात आणखी मोठा खेळ उघड होऊ शकतो. सोनम कुठल्यातरी तिसऱ्याच व्यक्तीसोबत पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. राजला या मोठ्या खेळीची माहिती नव्हती आणि म्हणूनच तो सोनम रघुवंशीला मदत करत राहिला. आता ही तिसरी व्यक्ती कोण आहे हे अद्याप उघड झालेले नाही. मेघालय पोलिसांकडून अद्याप याबद्दल कोणतेही विधान आलेले नाही.

राज भाऊ, मग तिसरा व्यक्ती कोण?

सोनमचे कुटुंब आणि प्लायवूड कंपनीत काम करणारे लोक वारंवार सांगत आहेत की सोनम आणि राज यांच्यात प्रेमसंबंध नव्हते. सोनमचा भाऊ गोविंद असेही म्हणाला की, राज सोनमला दीदी म्हणून हाक मारत असे आणि सोनम तीन वर्षांपासून त्याला राखी बांधत होती. अशा परिस्थितीत आता प्रश्न असा निर्माण होतो की जर सोनम आणि राज यांच्यात खरोखरच बहीण भावाचे नाते असेल तर सोनमने तिच्या पतीची हत्या नेमकी कोणासाठी केली? सध्या या अँगलचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Web Title: Raj Kushwaha is just a pawn Sonam raghuvanshi true love is someone else New twist in Raja Raghuvanshi murder case