शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते कॉस्टेबल अशा ११ जणांना वेतनवाढ रोखण्याची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 19:09 IST

बेजबाबदार व बेशिस्त वर्तनामुळे निरपराध व्यक्तींवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देपोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका

पुणे : गुन्ह्याचे गांभीर्य वाढवून पूर्ण चौकशी न करता जबरी चोरी सारखा गंभीर गुन्हा दाखल करणे तसेच तक्रार अर्ज नीट वाचून आरोपीविरुद्ध गुन्हा होतो का हे न तपासताच सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करणे अशा दोन प्रकरणात दोन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व काँस्टेबल अशा ११ जणांना २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी सुनावली आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील डिसेंबर २०१९ मधील एका गुन्ह्यात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह ७ जणांना ही शिक्षा देण्यात आली आहे़ या प्रकरणात फिर्यादीचा दाखलपात्र जबाब घेऊन वरिष्ठांचे परवानगीने गुन्हा दाखल केल्याचे दिसून येत नाही. यात ३९४ प्रमाणे घटना घडल्याबाबतचे कथन केल्याचे दिसून येत नाही असे असताना त्यात जबरी चोरीचे ३९४ कलम कसे नोंदविण्यात आले याचा काहीही बोध होत नाही. या प्रकरणात नियंत्रण कक्षाकडून आलेल्या कॉलपासून प्रत्येक टप्प्यात हलगर्जीपणा झाल्याचे चौकशी आढळून आल्याने ७ जणांना २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली आहे. दुसºया प्रकरणात सप्टेंबर २०१९ मध्ये विमानतळ पोलीस ठाण्यातील ३५४ (ए), ५००, ५०६, ५०९ व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस नाईक अशा चौघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा गुन्हा दाखल करताना त्या आधी संबंधित महिलेचा तक्रार अर्ज नीट वाचून १ ते ५ आरोपींविरुद्ध गुन्हा होतो का हे न तपासताच सर्वाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात फक्त एका आरोपीविरुद्ध सकृत दर्शनी पुरावा दिसतो मात्र इतर २ ते ५ आरोपींविरुद्ध चुकीचा गुन्हा दाखल आहे. बेजबाबदार व बेशिस्त वर्तनामुळे निरपराध व्यक्तींवर गुन्हा दाखल झालेला आहे.त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होण्यास कारणीभूत झाल्याने चौघांना २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcommissionerआयुक्त