शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिर असल्याचे भासवून लोकांना लुबाडणारे चोरटे गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 16:06 IST

याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मनोज कोनकरला बेड्या ठोकत त्याच्याकडून टीव्ही आणि फ्रीज हस्तगत केला आहे.

ठळक मुद्दे सत्यराज बोयर आणि बाबू बोयर अशी या चोरट्यांची नावं आहेत. त्यांच्याजवळ एक पिवळया रंगाचे “भारत सरकारकडून मिळालेले सर्टीफिकेट ” नावाचा बनावट कागदही असायचा. खडकपाडा पोलिसांनी या दोघांकडून तब्बल 31 मोबाईल आणि 1 कॅमेरा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कल्याण - तुमच्या घरच्या दारावर कोणी मूक - बधिर असल्याचे भासवून भीक मागण्यासाठी कोणी येत असेल तर सावधान. कारण मूकबधिर असल्याचे बनाव रचून भीक मागण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या दोघा सराईत चोरट्याना खडकपाडा पोलिसांनीअटक केली आहे. सत्यराज बोयर आणि बाबू बोयर अशी या चोरट्यांची नावं आहेत.हे दोघे मुके असल्याचे भासवून भिक मागण्यासाठी जायचे. तसेच त्यांच्याजवळ एक पिवळया रंगाचे “भारत सरकारकडून मिळालेले सर्टीफिकेट ” नावाचा बनावट कागदही असायचा. ज्यामध्ये ही व्यक्ती मुकी असून त्याच्या घरातील सदस्यांना हात-पाय नाहीत, आईने आत्महत्या केल्याचा पत्रात उल्लेख असायचा. भिक मागण्यासाठी जाणाऱ्या ठिकाणी लोकांना हे पत्र वाचण्यात देऊन आर्थिक मदतीसाठी याचना करायचे. एखाद्याने दया दाखवून मदत करण्यासाठी दरवाजा उघडा ठेवला तर दुसरा साथीदार घरातल्या व्यक्तीची नजर चुकवून घरात प्रवेश करायचा आणि मोबाईल किंवा किमती वस्तू चोरी करून पळ काढायचा. अशी या लोकांची चोरी करण्याची पद्धत होती. या चोरट्यांच्या मूक - बधिरपणाच्या नाटकाला भुलून अनेक जणांनी आपले मोबाईल आणि किमती वस्तू गमावल्या आहेत. खडकपाडा पोलिसांनी या दोघांकडून तब्बल 31 मोबाईल आणि 1 कॅमेरा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या लोकांनी आणखी किती लोकांच्या घरी अशाप्रकारे चोरी केली आहे याचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.

तर आशिष उर्फ आशु राजकुमार राजोरीया, मनोज कोनकर हे घरफोडीच्या गुन्ह्यामधील आरोपीनाही खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घराची कडी उघडून 152 ग्राम सोन्याचे दागिने, 8 ग्राम चांदीचे दागिने आणि 8 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. खडकपाडा पोलिसांनी खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशमधून आशु राजोरीयाला पकडले. त्याच्याकडून 113 ग्रॅम सोन्याचा ऐवज हस्तगत केला असून दुसऱ्या गुन्ह्यामध्ये चोरट्याने घराचे लॉक तोडून टीव्ही, फ्रीज चोरून तर नेलेच पण घरालाही आग लावली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मनोज कोनकरला बेड्या ठोकत त्याच्याकडून टीव्ही आणि फ्रीज हस्तगत केला आहे.

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीkalyanकल्याणPoliceपोलिस