शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 19:39 IST

दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली...

ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

पिंपरी : दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या दोन आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनीअटक केली. अटक केलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या अन्य एका साथीदारासोबत मिळून २००९ साली भोसरी परिसरात गंभीर दुखापतीचा गुन्हा केला होता. अनिल रावसाहेब गायकवाड उर्फ जाधव (वय २५), चंद्रकांत गोविंद पवार (वय ३३, दोघे रा. शांतिनगर, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, भोसरी परिसरात गंभीर दुखापतीचा गुन्हा केलेले दोन आरोपी शांतीनगर झोपडपट्टी मधील बौद्ध विहाराजवळ येणार आहेत. या आरोपींनी त्यांच्या आणखी एका साथीदारासोबत मिळून २००९ साली गंभीर दुखापतीचा गुन्हा केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने दोघांना अटक केली. आरोपी आणि शांतीनगर येथील नागरिक डोंगºया राठोड यांचामध्ये २००९ साली किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी आरोपी अनिल गायकवाड, चंद्रकांत पवार आणि शिवदास गायकवाड या तिघांनी मिळून डोंगºया राठोड याला मारून जखमी केले. दरम्यान, पोलिसांनी शिवदास गायकवाड याला अटक केली. पण अन्य दोघेजण अद्याप फरार होते.   ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम  तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, कर्मचारी मनोज कुमार कमले, गणेश सावंत, प्रवीण मोरे, विजय मोरे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस