बदलीचं आमिष दाखवून गंडा! ज्योतिषाने आयकर अधिकाऱ्याला लुटलं; ३५ लाखांचं सोनं घेऊन फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:18 IST2026-03-10T16:17:25+5:302026-03-10T16:18:20+5:30

एका आयकर अधिकाऱ्याने बदलीच्या आशेने रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसणाऱ्या एका ज्योतिषावर विश्वास ठेवला.

parrot astrology scam bengaluru income tax officer cheated gold jewellery | बदलीचं आमिष दाखवून गंडा! ज्योतिषाने आयकर अधिकाऱ्याला लुटलं; ३५ लाखांचं सोनं घेऊन फरार

बदलीचं आमिष दाखवून गंडा! ज्योतिषाने आयकर अधिकाऱ्याला लुटलं; ३५ लाखांचं सोनं घेऊन फरार

बंगळुरूमध्ये फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आयकर अधिकाऱ्याने बदलीच्या आशेने रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसणाऱ्या एका ज्योतिषावर विश्वास ठेवला. आरोपीने भविष्य सांगण्याचं आणि विशेष पूजा करण्याचं आमिष दाखवून या अधिकाऱ्याचे लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. जोपर्यंत अधिकाऱ्याला सत्य समजलं, तोपर्यंत तो ज्योतिषी आणि त्याचा पोपट दोन्ही गायब झाले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा आयकर अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून बंगळुरूच्या आयकर कार्यालयात कार्यरत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो भरतीनगरमधील श्री सर्कल परिसरातून जात असताना, रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसलेला भविष्य सांगणारा एक व्यक्ती त्याला भेटला. आरोपीने चेहरा आणि कुंडली पाहून भविष्य सांगण्याचा दावा केला. येथूनच दोघांमधील संवाद सुरू झाला आणि हळूहळू आरोपीने अधिकाऱ्याचा विश्वास संपादन केला.

पूजेच्या नावाखाली घेतले ५० हजार

शेखर असं या आरोपीचे नाव असून तो श्री सर्कलजवळ पोपटाच्या मदतीने भविष्य सांगण्याचं काम करायचा. त्याने अधिकाऱ्याला सांगितलं की, काही विशेष पूजा केल्यास त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. सुरुवातीला त्याने पूजेच्या नावाखाली अधिकाऱ्याकडून ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर तो सतत फोनद्वारे अधिकाऱ्याच्या संपर्कात राहिला आणि विश्वास संपादन करत गेला. अधिकाऱ्यालाही वाटलं की हा व्यक्ती खरोखरच आपली मदत करू शकतो.

बदलीसाठी मागितले सोन्याचे दागिने

काही काळानंतर अधिकाऱ्याने शेखरला आपल्या बदलीच्या शक्यतेबद्दल विचारलं. त्यावर ज्योतिषाने सांगितलं की, यासाठी मोठी पूजा करावी लागेल. त्याने अधिकाऱ्याला घरातून सोन्याचे दागिने आणण्यास सांगितले जेणेकरून पूजेमध्ये त्यांचा वापर करता येईल. ज्योतिषाच्या बोलण्याला फसून अधिकाऱ्याने १९४ ग्रॅम सोन्याचे दागिने (ज्याची किंमत सुमारे ३५ लाख रुपये आहे) आणि साधारण १.३ किलोग्रॅम चांदी त्याला दिली.

दागिने परत करण्यास टाळाटाळ 

शेखरने एका दिवसात पूजा पूर्ण करून दागिने परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर तो विविध कारणं सांगून दागिने परत करण्यास टाळाटाळ करू लागला. कधी पूजा पूर्ण झाली नसल्याचं सांगायचा, तर कधी इतर काही कारणं पुढे करायचा. अशा प्रकारे त्याने अधिकाऱ्याला सुमारे एक आठवडा वाट पाहायला लावली. याच दरम्यान अधिकाऱ्याला थोडा संशय आला, पण दागिने परत मिळतील या आशेवर तो राहिला.

ज्योतिषी आणि पोपट दोन्ही गायब

शेवटी जेव्हा अधिकारी स्वतः भरतीनगरच्या श्री सर्कल येथे पोहोचला, तेव्हा तेथील दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. तिथे ना ज्योतिषी शेखर होता ना त्याचा पोपट. दोघेही दागिने घेऊन फरार झाले होते. तेव्हा अधिकाऱ्याला आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने भरतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून आरोपी ज्योतिषाचा शोध सुरू केला आहे.
 

Web Title : ज्योतिषी ने आयकर अधिकारी को ठगा: तबादले का लालच, 35 लाख का सोना चोरी

Web Summary : बेंगलुरु में एक ज्योतिषी ने तबादले का वादा करके आयकर अधिकारी को धोखा दिया। ज्योतिषी ने विशेष पूजा के नाम पर 35 लाख रुपये का सोना लिया। ज्योतिषी और उसका तोता गायब हैं, पुलिस धोखाधड़ी की जांच कर रही है।

Web Title : Astrologer Swindles Tax Officer: Gold Lured, Rupees 35 Lakhs Stolen

Web Summary : A Bengaluru tax officer was duped by an astrologer who promised a transfer. The astrologer took gold worth ₹35 lakhs under the guise of performing special poojas. The astrologer and his parrot are now missing, and police are investigating the fraud.