सवती मत्सराचा भडका, पत्नीकडून नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला पेटविण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 02:03 PM2020-11-22T14:03:57+5:302020-11-22T14:04:41+5:30

nagpur Crime News : सवती मत्सराने पेटलेल्या एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

Outburst of jealousy, attempt by wife to set fire to husband's second wife | सवती मत्सराचा भडका, पत्नीकडून नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला पेटविण्याचा प्रयत्न 

सवती मत्सराचा भडका, पत्नीकडून नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला पेटविण्याचा प्रयत्न 

googlenewsNext

नागपूर : सवती मत्सराने पेटलेल्या एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांदेखत शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास भरोसा सेल मध्ये ही घटना घडली. प्रसंगावधान राखत वेळीच पोलिसांनी आरोपी महिलेला अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला. 

सविता विनोद सव्वालाखे (वय ३९) असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. विनोद सव्वालाखे हा शांतीनगरात राहतो. त्याचे पॅकेजिंगचे काम आहे. मौसमी शेखर झोडे (वय ३२) ही त्याच्याकडे काम करीत होती. तिच्या पतीचे निधन झाल्याने मौसमी आणि विनोदचे सूत जुळले. विनोद आपल्या पत्नी, मुलांना अंधारात ठेवून मौसमी सोबत १९ मार्च २०२० ला लग्न केले. हा प्रकार माहीत झाल्यानंतर विनोदच्या घरी वाद वाढला. प्रकरण शांतीनगर पोलीस ठाण्यात गेले.

त्यांनी दोन्ही महिलांची समुपदेशन करण्यासाठी त्यांना भरोसा सेलमध्ये पाठविले. तेथे शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास हे सर्व  भरोसा सेलच्या आवारात बेंचवर बसून होते. अचानक सविताने धावत येऊन मौसमीच्या अंगावर पेट्रोलची भरलेली बाटली ओतली. लगेच तिने जवळ लपवून ठेवलेली माचीसही बाहेर काढली. हा प्रकार पाहून प्रसंगावधान राखत बाजूला असलेल्या महिला पोलीस धावल्या. त्यांनी सविताला घट्ट पकडून ठेवले. मौसमीच्या अंगावर पाणी ओतण्यात आले. या घटनेनंतर भरोसा सेलमध्ये एकच खळबळ उडाली. तेथील महिला पोलिसांनी सविताला पकडून प्रतापनगर ठाण्यात आणले. 
 
पोलीस ठाण्यातही थयथयाट 
या प्रकारामुळे मौसमी प्रचंड घाबरली होती. ती तक्रार देण्यासाठी टाळाटाळ करीत होती. मात्र सविताचा थयथयाट पोलीस ठाण्यातही सुरूच होता. हिला सोडणार नाही, असे ती ओरडून सांगत होती. तिला अटकाव केला नाही तर ती मोठा गुन्हा करू शकते,  हे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी मौसमीकडून तक्रार लिहून घेतली. त्यावरून सविताविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

Web Title: Outburst of jealousy, attempt by wife to set fire to husband's second wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.