शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून युवकाने गुप्तीने भोसकून युवतीची केली निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 18:01 IST

Murder Case : आकाशने सुवर्णाच्या पोटात गुप्तीने वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) असे मृत युवतीचे नाव आहे. आकाश श्रीराम आडे (२५) हा आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

पुसद (यवतमाळ) :  एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका युवतीचा चाकू व गुप्तीने भोसकून खून केला. तालुक्यातील रामपूरनगर येथे शनिवारी (१५ मे) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही धक्‍कादायक घटना घडली.  यातील आरोपीला सायंकाळच्या सुमारास खंडाळा पोलिसांनी धनसळ परिसरातील जंगलातून अटक केली. 

सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) असे मृत युवतीचे नाव आहे. आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपी युवकाचे नाव आहे. खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामपूरनगरात ही घटना घडली. मृत युवती सुवर्णा आणि आरोपी आकाश हे दोघेही एकाच  गावात राहात होते. त्यांच्यात ओळख झाली. आकाश हा सुवर्णावर  एकतर्फी प्रेम करीत होता. सुवर्णाने दहावीपर्यंतचे शिक्षण गावात घेतले. त्यानंतर तिने पुसद येथे बारावीचे शिक्षण घेऊन नंतर  डीएड पदविका प्राप्त केली. त्यानंतर ती गावी आई-वडिलांसोबत राहत होती. 

शनिवारी सकाळी सुवर्णाचे आई व वडील पांढुर्णा (केदारलिंग) येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते तर  तिचा भाऊ श्याम काही कामानिमित्त देवठाणा येथे गेला होता. यावेळी घरी सुवर्णा व तिची वृद्ध आजी होती. सुवर्णा भांडे घासत असताना आरोपी आकाश तिच्या घरी पोहोचला. त्याने सुवर्णाच्या आजीला एका खोलीत कोंडून ठेवले. नंतर भांडे घासत असणाऱ्या सुवर्णावर चाकू व गुप्तीने सपासप वार केले. काही क्षणातच सुवर्णा रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतर आकाशने घटनास्थळावरून पळ काढला.  या घटनेची माहिती गावकऱ्यांनी खंडाळा पोलिसांना व तिच्या पालकांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठले. गंभीर जखमी अवस्थेत सुवर्णाला पुसद येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र काही वेळातच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

पाच पथके होती मागावरआरोपी फरार झाल्याने खंडाळा पोलिसांनी त्याचा शोधासाठी पाच पथक तयार केले होते. अखेर शनिवारी सायंकाळी आकाशला धनसळ परिसरातील जंगलातून अटक करण्यात आली. 

दोनही कुटुंब सर्वसाधारणच मृतक सुवर्णा व आरोपी आकाश या दोघांचेही कुटुंब सर्वसाधारणच आहे. रोजमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. काही महिन्यांपासून आकाश सुवर्णावर एकतर्फी प्रेम करीत होता. याची तिला खबरबातही नव्हती. अखेर शनिवारी आकाशने तिचे घर गाठून निर्घृण खून केला. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

सुवर्णावर झालेल्या हल्ल्याची खबर अगदी वेगात गावामध्ये पसरली. त्यामुळं काही वेळातच याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळं परिसरात प्रचंड खळबळ पसरली आहे. सुवर्णा हिची हत्या ही प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा या घटनेनंतर परिसरात पसरली आहे. खंडाळा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आकाश आडे या तरुणाला अटक केली असून, घटनेबाबत तपास सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूYavatmalयवतमाळPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट