शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला युवक, गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीला कायमचं संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 12:30 IST

बंगळुरूत २४ वर्षीय युवतीच्या हत्येने खळबळ, हत्या करून आरोपी झाला होता पसार, पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 

बंगळुरू - बंगळुरूच्या कोरमंगला येथे राहणाऱ्या हॉस्टेलमधील २४ वर्षीय बिहारच्या युवतीच्या हत्येतील आरोपीला मध्य प्रदेशातून अटक केली आहे. या आरोपीचं नाव अभिषेक असून ज्यानं २३ जुलैच्या रात्री कृतीकुमारीची निर्घृण हत्या  केली आणि त्यानंतर मध्य प्रदेशला पसार झाला. कृतीची हत्या का आणि कशासाठी केली याबाबत बंगळुरू पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. 

२४ वर्षीय युवती एका खासगी कंपनीत काम करत होती. मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास वीआर लेआऊट येथील हॉस्टेलमध्ये हल्लेखोर घुसला आणि त्याने तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कृतीवर खोलीत जात चाकूने गळा कापला. या घटनेत युवतीचा जागीच मृत्यू झाला. व्येंकटरेड्डी लेआऊट येथील भार्गवी स्टेइंग होम्स फॉर लेडिज इथली ही घटना आहे. हे ठिकाण दक्षिण पूर्व पोलीस उपायुक्त कार्यालय आणि कोरमंगला पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किमी अंतरावर आहे. जी युवती हल्ल्यात मृत्युमुखी पडली तिची मैत्रिण हल्लेखोराची प्रेयसी होती. 

प्राथमिक तपासात हल्लेखोर ओळखीचा व्यक्ती होता. मात्र या घटनेमुळे हॉस्टेलच्या प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. मूळची बिहारची असणारी २४ वर्षीय कृती बंगळुरुतील खासगी कंपनीत काम करायची. या हल्ल्यावेळी आरोपी पीजी हॉस्टेलमध्ये एक बॅग घेऊन शिरतो. काही वेळात कृती दरवाजा उघडते तेव्हा तिचे केस पकडून तो बाहेर खेचतो आणि चाकूने तिच्यावर हल्ला करतो. पीडित युवती हल्ल्याचा विरोध करते परंतु आरोपी तिच्यावर चाकूने वार करत होता. अखेर तिच्या गळ्याला चाकूने कापतो हा सगळा थरारक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

दरम्यान, हॉस्टेलमध्ये जोरजोरात आरडाओरड सुरू झाल्याने तिथे अन्य मुली येऊन पोहचताच, परंतु तिला कुणीही वाचवू शकले नाही. पीडित मुलगी बराच वेळ मदत मागत राहिली परंतु तिच्या मदतीसाठी कुठलीही युवती पुढे आली नाही. ही युवती रक्ताच्या थारोळ्यात मदतीसाठी विनवणी करत राहिली आणि तिथेच जीव सोडला. मंगळवारी रात्री ११.१० ते ११.३० या वेळेत हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला असं पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी