शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भरदिवसा 'मुळशी पॅटर्न'फेम थरार! रस्त्यावर पाठलाग करत दोघांवर धारदार शस्त्राने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 23:52 IST

एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांनी एकजण ताब्यात

पुणे (धनकवडी) : बिबवेवाडी येथील गंगाधाम रस्त्यावर पाठलाग करत दोघांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी अकराच्या सुमारास ऐन वर्दळीच्या वेळी घडली. बिबवेवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सलीम मेहबूब शेख, (वय २४) व तौफिक शेख( वय २७) मृत्यू झालेेल्या व्यक्तीची नावे आहेेेत. या प्रकरणी पोलीसांनी एकास ताब्यात घेतले असून हा खून पुर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आरोपी व मृत यांच्यामध्ये पुर्वी पासून वाद होते. आज सकाळीही त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून ही घटना घडली. मृत व आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. अनेकदा ते मद्यपान करण्यास एकत्र बसत होते. यातूनच त्यांच्यात वाद होत होते. सलीम व तौफिक मुख्य रस्त्यापासून आतल्या रस्त्याकडे जात असताना आरोपी अचानक त्यांच्यामागून आला. त्याने दोघांनाही काही समजायच्या आतच पालघनसारख्या हत्याराने त्यांच्यावर वार केले. हे वार वर्मी लागल्याने सलीमचा जागेवरच मृत्यू झाला तर तोहफिकला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे व पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तत्काळ घटनास्त्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनPoliceपोलिसArrestअटकBibvewadiबिबवेवाडी