'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 20:48 IST2025-08-16T20:46:55+5:302025-08-16T20:48:14+5:30

आत्महत्या करण्यापूर्वी शिवमने एक सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात त्याने आई वडिलांची माफी मागितली आहे. 

'Mom, Dad, I'm sorry, I couldn't help you'; B.Tech student ends life | 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

शिवम बी.टेकच्या अंतिम वर्षाला शिकत होता. १५ ऑगस्टच्या रात्री त्याने आईवडिलांची माफी मागणारी एक सुसाईड लिहिली आणि चादरीचा फास तयार करून मृत्युला कवटाळले. ग्रेटर नोएडातील शारदा विद्यापीठात ही घटना घडली. वसतिगृहामध्येच शिवमने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शिभम डे असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात असलेल्या मधुबनीचा रहिवाशी होता. शिवमने १५ ऑगस्टच्या रात्री वसतिगृहामधील खोलीत चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो बी.टेकच्या अंतिम वर्षाला शिकत होता. नॉलेज पार्क पोलिसांना एका खासगी रुग्णालयातून शिवमने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याबद्दल कळवण्यात आले.  

ही चिठ्ठी वाचत असाल, तेव्हा मी मेलेलो असेल

पोलिसांना शिवमच्या खोलीत सुसाईड नोट सापडली. तणाव सहन होत नसल्याने मी हे पाऊल उचलत आहे, असे शिवमने म्हटले आहे. 

"जेव्हा तुम्ही हे वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल. आत्महत्या करण्याचा निर्णय माझाच आहे. याला कोणीही जबाबदार नाही. हे जग माझ्यासाठी नाहीये. मी कोणाच्याही कामाचा नाही. मी पोलिसांना विनंती करतो की, माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये", असे शिवमने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. 

"मी त्या सर्वांची माफी मागतो, जे माझ्यावर प्रेम करत होते. सॉरी... आई-बाबा तुमच्या म्हातारपणात आधार बनू शकलो नाही. मी आता आणखी ताण आणि ओझं सहन करू शकत नाही", असेही शिवमने म्हटले आहे. 

मला घाबरू नका, मी कुणाच्याही मागे लागणार नाही

शिवमने म्हटले आहे की, 'लोकांनी मला घाबरू नये. मेल्यानंतर मी कोणाच्याही मागे लागणार नाही.'

शिवमचे वडील कार्तिक डे आणि त्याचा मामेभाऊ शुभांकर यांनी सांगितले की, महाविद्यालयाकडून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कळलं की, शिवम दोन वर्षांपासून कॉलेजला येतच नव्हता. भाऊ म्हणाला की, त्याची फीस वेळेवर भरली जात होती. पण, महाविद्यालयातून कधीही सांगितलं गेलं नाही की, तो वर्गात येत नाही. 
 

Web Title: 'Mom, Dad, I'm sorry, I couldn't help you'; B.Tech student ends life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.