विनयभंग केलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या नाही, महिलेने पोलीस ठाण्यासमोर घेतले जाळून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 02:10 PM2022-01-12T14:10:12+5:302022-01-12T14:11:56+5:30

Molestation Case : ३५ वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी गावातीलच दोन लोकांनी विनयभंग केला होता, ज्याचा गुन्हा रायामध्ये पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

The molested accused was not handcuffed, the woman was taken to the police station and burnt | विनयभंग केलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या नाही, महिलेने पोलीस ठाण्यासमोर घेतले जाळून

विनयभंग केलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या नाही, महिलेने पोलीस ठाण्यासमोर घेतले जाळून

Next

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे विनयभंगाच्या आरोपीला अटक न केल्याने संतापलेल्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पीडित महिलेने पोलिस ठाण्याच्या गेटवरच स्वतःला जाळून घेऊन हे पाऊल उचलले. या घटनेनंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मथुरेतील थाना राया भागातील गैयरा गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी गावातीलच दोन लोकांनी विनयभंग केला होता, ज्याचा गुन्हा रायामध्ये पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. पीडित महिलेच्या पतीचे असे म्हणणे आहे की, या प्रकरणी राजीनाम्यासाठी गुंडांकडून दबाव निर्माण केला जात होता. चार वर्षांपासून या प्रकरणावर कोणतीही कारवाई न झाल्याने पत्नीने हे पाऊल उचलले. अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून राया पोलीस ठाण्याच्या गेटजवळ स्वतःला पेटवून घेतले. 


त्याचवेळी महिलेने असे पाऊल उचलताच पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तातडीने आग विझवली. यानंतर महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिला गंभीर अवस्थेत आग्रा येथे पाठवण्यात आले आहे.

खळबळजनक! नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

"मी पोलिसांना घाबरत नाही!" असं म्हणणाऱ्या सासऱ्याने सुनेचे दोन्ही हात तलवारीने कापले


येथे एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर सांगतात की, राया परिसरात राहणारी एक महिला विनंती पत्र देण्यासाठी आली होती. पतीच्या म्हणण्यानुसार, त्याने पत्नीला आग लावताना पाहिले होते. गावातील काही लोकांशी त्यांचा जुना वाद सुरू असून त्यात काही गुन्हेही दाखल असल्याचे त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास एसपी देहात हे करत आहेत.

Web Title: The molested accused was not handcuffed, the woman was taken to the police station and burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.