खळबळजनक! नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 12:51 PM2022-01-12T12:51:36+5:302022-01-12T18:40:17+5:30

Gangrape Case : पीडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपींना पकडण्याचा दावा करत आहेत.

Deaf and dumb girl gang-raped and thrown into the street in a bloody situation | खळबळजनक! नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

खळबळजनक! नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

googlenewsNext

राजस्थानच्या अलवरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपींनी मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या मुलीला उचलून तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना घडली आहे. मुलीला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी फरार झाले. स्थानिक लोकांच्या मदतीने पीडित मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपींना पकडण्याचा दावा करत आहेत.

 वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले

जिल्हाधिकारी नन्नू मल पहाडिया आणि अलवरचे एसपी (पोलीस अधीक्षक) तेजस्विनी गौतम यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मुलीची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला जयपूरला पाठवले आहे. मुलीच्या गुप्तांगाला धारदार वस्तूने दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जखमा होऊन खूप रक्तस्त्राव झाला होता.
 

गुप्तांगाला अनेक जखमा

मुलीची ओळख पटली आहे, ती फक्त आई आणि वडील इतकंच बोलू शकते. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पथके पाठवली आहेत. अलवरचे पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, 5 टीम तयार करण्यात आल्या असून पीडितेच्या काकांच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे कुटुंबीयही जयपूरला पोहोचले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मुलीसोबत क्रौर्याची परिसीमा ओलांडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी रात्रीपासूनच आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही.

पोलीस आरोपींच्या शोधात

सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तरुणीच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. या घटनेने दिल्लीतील निर्भया प्रकरणाची कटू आठवण झाली आहे. त्यानंतर देशात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारावरही कडक कायदा करण्यात आला. असे असतानाही मुलींवरील बलात्काराच्या घटना कमी झाल्या नाहीत, अलवरमध्ये अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहे. सध्या पीडिता मृत्यूच्या दाढेत आहेत. 

Web Title: Deaf and dumb girl gang-raped and thrown into the street in a bloody situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.