निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?

अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीग २०२४ सीझनचा पहिला सामना आज खेळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 11:11 PM2024-05-17T23:11:01+5:302024-05-17T23:11:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, MI vs LSG Live Marathi : Arjun Tendulkar leaves field with suspected injury after Nicholas Pooran onslaught  | निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?

निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, MI vs LSG Live Marathi :  अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीग २०२४ सीझनचा पहिला सामना आज खेळला. MI आधीच लीगमधून बाहेर पडले आहेत आणि १३ सामन्यांत केवळ चार विजयांसह ते गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहेत. निकोलस पूरन व लोकेश राहुलची फटकेबाजी पाहून अर्जुन दबावाखाली आलेला पाहायला मिळाला. त्याच्या सलग दोन फुलटॉसवर पूरनने खणखणीत षटकार खेचले. पण, त्यानंतर त्याने मैदान सोडले. त्याच्या पायात चमक भरल्याने त्याला मैदान सोडण्यास भाग पाडले. अर्जुनच्या दुखापतीबद्दल प्रसारकांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अर्जुनने २.२ षटकांत २२ धावा दिल्या. 


अर्जुनची IPL कारकीर्द कशी राहिली?
अर्जुन तेंडुलकरला २०२१ मध्ये आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांना त्यांच्या संघात समावेश केला होता. पण अर्जुनला दुखापत झाली आणि त्यामुळे तो संपूर्ण हंगामाला मुकला. त्याच्या जागी सिमरजीत सिंगला संघात संधी मिळाली. यानंतर मुंबई इंडियन्सने २०२२ च्या लिलावात ३० लाखांत त्याला पुन्हा घेतले. अर्जुनने १६ एप्रिल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पण केले. अर्जुनने या सामन्यात २ षटकांत १७ धावा दिल्या होत्या. मुंबई इंडियन्सने गेल्या तीन वर्षांत एकूण ४४ सामने खेळले आहेत. यामध्ये अर्जुनला केवळ ५ सामन्यात संधी मिळाली. ५ सामन्यांमध्ये त्याने ९.५० च्या इकॉनॉमीने ३ विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुनने या कालावधीत ९५ धावा केल्या.

निकोलस पूरन व लोकेश राहुल यांच्या १०९ धावांच्या महत्त्वाच्या भागीदारीच्या जोरावर LSG ने ६ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. ३ फलंदाज ६९ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार लोकेश व निकोलस यांनी MI च्या गोलंदाजांचा समाचार घेतला. निकोलसने २९ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांच्या आतषबाजीसह ७५ धावा केल्या आणि राहुलसह ४४ चेंडूंत १०९ धावा जोडल्या. लोकेशने ४१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावा केल्या. नुवान तुषाराने २८ धावांत ३, तर पियुष चावलाने २९ धावांत ३ विकेट्स पूर्ण केल्या. तुषाराने १७व्या षटकाच्या पाचव्या व सहाव्या षटकावर विकेट घेतली, ततर पियुषने १८व्या षटकात विकेट घेऊन संघाची हॅटट्रिक पूर्ण केली.


 

Web Title: IPL 2024, MI vs LSG Live Marathi : Arjun Tendulkar leaves field with suspected injury after Nicholas Pooran onslaught 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.