शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट व मालिका ऑडिशनच्या नावाखाली युवतीचा विनयभंग : प्रभात रस्त्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 20:29 IST

टीव्ही मालिका, फिल्मसाठी किरकोळ भूमिका करण्यासाठी लोकांचा पुरवठा करतो..

पुणे : फिल्म, टिव्ही सिरियलसाठीच्या ऑडिशनसाठी फोटो शुट करायचे असल्याचे सांगून युवतीला घरी बोलावून तिचा विनयभंग करणाऱ्यास डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे़.  मंदार संजय कुलकर्णी (वय २४, रा़. वसंत बहार अपार्टमेंट, प्रभात रोड) असे या तरुणाचे नाव आहे़. याप्रकरणी एका १७ वर्षाच्या युवतीने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मंदार कुलकर्णी व फिर्यादी युवती हे एकमेकांचे ओळखीचे आहेत़. फिल्म, टिव्ही मालिकांसाठी लागणाऱ्या अभिनयासाठी युवक युवतींची शिफारस करतो, असे सांगितले व या युवतीला त्याने अ‍ॅडिशनसाठी घरी बोलावले़. त्याप्रमाणे १६ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता ही युवती त्याच्या घरी आली़. मंदार याने तिला फोटो शुट करायचे आहे, असे सांगून तिचे बिकनीचे व पाठीचे फोटो मोबाईलवर काढले़ ते तिला दाखवून तिच्या कपड्याचे माप घेऊन अंगावरील कपडे काढण्यास सांगितले व तिला लज्जास्पद वाटेल असे कृत्य केले़, असे फिर्यादीत म्हटले आहे़. या युवतीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन मंदार कुलकर्णी याला अटक केली आहे़. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले की, मंदार कुलकर्णी याने आपण टीव्ही मालिका, फिल्मसाठी किरकोळ भूमिका करण्यासाठी लोकांचा पुरवठा करतो, असे सांगत आहे़. त्याने यापूर्वी अनेकांची अशाप्रकारे शिफारस केली आहे़. त्यातून यापूर्वी असे अनेक प्रकार घडले असण्याची शक्यता आहे़. मात्र, अजून कोणी तक्रार देण्यासाठी पुढे  आले नाही़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंग