शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
5
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
6
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
7
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
8
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
9
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
10
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
11
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
12
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
13
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
14
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
15
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
16
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
18
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
19
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
20
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi: प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:49 IST

Sonam RaghuWanshi: सोनम हनिमूनला जाणार होती. ती लग्न झाल्या झाल्याच हनिमूनला निघण्यासाठी पती राजाच्या मागे लागली होती. परंतू, राजाने काही दिवसांनी जाऊ असे सांगितले होते.

हनिमूनला शिलाँगला गेलेल्या राजा रघुवंशीची मारेकरी त्याची पत्नी सोनम रघुवंशीत निघाली आहे. गेल्या १६ दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा आता एकेक धागा समोर येऊ लागला आहे. १६ दिवसांचा सस्पेंस २४ तासांत उलगडला आहे. आपले साथीदार पकडले गेल्याचे समजताच शातीर प्लॅन आखणाऱ्या सोनमने देखील सरेंडर केले आहे. सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा या दोघांनी मिळून राजाचा काटा काढण्याचा प्लॅन आखला होता. तो आता समोर आला आहे. 

सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली

सोनम हनिमूनला जाणार होती. ती लग्न झाल्या झाल्याच हनिमूनला निघण्यासाठी पती राजाच्या मागे लागली होती. परंतू, राजाने काही दिवसांनी जाऊ असे सांगितले होते. त्यांना पहलगामला जायचे होते. परंतू तिथे हल्ला झाल्याने शिलाँग ठरले. सोनमच्या मनात वेगळाच प्लॅन असल्याने तिने झटकन जायची तिकीटे बुक केली, परंतू यायची केली नाही. त्याची माहिती तिने राजकडूनच घेतली होती. राजकडे सुपारी किलर होते, त्याने त्यांना विचारून मगच सोनमला ग्रीन सिग्नल दिला होता. 

सोनम आणि राजा शिलाँगला निघाले तसे हे तीन कॉन्ट्रॅक्ट किलर्सदेखील शिलाँगला पाठोपाठ निघाले होते. राज मात्र सोनमच्या वडिलांच्या फॅक्टरीतच काम करत होता. तो शिलाँगला गेलाच नाही, असे पोलीस चौकशीत समोर आले आहे. तो केवळ फोनवरून सोनम आणि सुपारी घेणारे यांच्याशी संपर्कात होता. राजने सांगितल्यानुसार सोनम त्या कॉन्ट्रॅक्ट किलर्सना भेटली. यानंतर सारे चेरापुंजीला गेले. तिथे सोनम ठरल्याप्रमाणे राजाला घेऊन निर्मनुष्य रस्त्यावर गेली. तिथे आधीच हे तिघे होते. त्यांनी राजाला मारत त्याची हत्या केली. 

राजाचा मृतदेह दरीत फेकल्यावर सोनम आणि आकाश, विशाल आणि आनंद हे तिघे किलर्स शिलाँगला आले होते. तिथून ते गुवाहाटीला गेले. गुवाहाटीला एक दिवस राहून सोनम आणि हे तिघे असे चौघे वेगवेगळ्या मार्गाने परतीच्या प्रवासाला निघाले. परंतू, जेव्हा सोनमचा मृतदेह सापडला नाही तेव्हाच पोलिसांना सोनमवर संशय आला होता. तिचाच राजाच्या हत्येमागे मोठा हात असल्याचा संशय होता. ज्या गाईडने या तिघांना सोनम आणि राजासोबत पाहिले होते, त्याला हिंदी येत नव्हती. त्याला मेघायलची भाषा आणि इंग्रजी येत होती. यामुळे हे चौघे हिंदीत काय बोलत होते ते समजले नाही. चार पुरुष पुढे चालत होते, तर सोनम मागे फोनवर बोलत, चॅट करत चालत होती. परंतू, त्याने दिलेली ही टीप पोलिसांच्या कामी आली आणि पुढे तपासाला दिशा मिळाली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी