शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Roy : "रक्ताच्या थारोळ्यात पडलेली डॉक्टर, मी घाबरून पळून गेलो"; आरोपी संजय रॉयचा नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 11:38 IST

Kolkata Doctor Case And Sanjay Roy : आरोपी संजय रॉय याने आता नवा दावा केला आहे. संजयने त्याची वकील कविता सरकार यांना सांगितलं आहे की, तो निर्दोष आहे आणि त्याला यात अडकवलं जात आहे.

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी संजय रॉय याने आता नवा दावा केला आहे. संजयने त्याची वकील कविता सरकार यांना सांगितलं आहे की, तो निर्दोष आहे आणि त्याला यात अडकवलं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कविता सरकार म्हणाल्या की, पॉलीग्राफ टेस्टच्या वेळीही संजयने आपण निर्दोष असल्याचं सांगितलं होतं. 

महिला डॉक्टरचा खुनी आपण नाही, असंही त्याने म्हटलं आहे. तिचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून तो पळून गेला असल्याचं सांगितलं. पॉलीग्राफी टेस्टदरम्यान संजय रॉयला दहा प्रश्न विचारण्यात आले होते, ज्यात ट्रेनी डॉक्टरची हत्या केल्यानंतर पुढे काय केलं? हा प्रश्नही होता. त्याने सीबीआय अधिकाऱ्यांना सांगितलं की प्रश्न चुकीचा आहे, कारण त्याने तिची (ट्रेनी डॉक्टर) हत्या केलेली नाही.

संजयने पॉलीग्राफ टेस्टमध्ये दावा केला आहे की, हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना ती बेशुद्ध पडली होती. ९ ऑगस्ट रोजी सेमिनार हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला पाहिल्याचं संजयने सांगितलं. वृत्तपत्रानुसार, संजय रॉयने दावा केला की, डॉक्टरला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून तो घाबरून गेला आणि खोलीतून बाहेर पळाला.

वृत्तपत्राशी बोलताना आरोपी संजय रॉयच्या वकिलाने सांगितलं की, जर एखाद्याला त्या खोलीत प्रवेश करणे इतकं सोपं होतं, तर संजय व्यतिरिक्त कोणीही तेथे जाण्याची शक्यता आहे. आपण पीडितेला ओळखत नसून फसवलं जात असल्याचा दावाही संजय रॉयने केला. आपण निर्दोष असल्यास पोलिसांना का कळवलं नाही असं विचारलं असता, त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही याची भीती वाटत असल्याचं संजयने सांगितलं.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी