तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 12:51 IST2020-10-21T12:51:01+5:302020-10-21T12:51:25+5:30

नालासोपारा पूर्वेतील एव्हरशाइन रोडवरील अँकर पार्कमध्ये राहणारा सूरज मंडल (२४) आणि त्याचे मित्र सोनू मंडल, माधव व राघव झा असे चौघे मित्र रविवारी संध्याकाळी मोबाइलमध्ये आयपीएल मॅच बघत बसले होते.

Knife attack on Young man in nalasopara | तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल​​​​​​​

तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल​​​​​​​


नालासोपारा : रविवारी संध्याकाळी सुरू असलेली भांडणे बघितल्याच्या रागातून चार तरुणांपैकी एकावर आरोपीने चाकूने पाठीवर आणि पोटात ४-५ वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तुळिंज पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वेतील एव्हरशाइन रोडवरील अँकर पार्कमध्ये राहणारा सूरज मंडल (२४) आणि त्याचे मित्र सोनू मंडल, माधव व राघव झा असे चौघे मित्र रविवारी संध्याकाळी मोबाइलमध्ये आयपीएल मॅच बघत बसले होते. शेजारीच एक पुरुष आणि दोन महिलांची भांडणे सुरू होती. ही भांडणे बघितली म्हणून रागाच्या भरात आरोपीने चौघांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने त्याच्या साथीदारांना फोन करून बाेलावून घेतले. त्यापैकी एकाने सूरजच्या पाठीवर आणि पोटात चाकू भोसकून वार करत गंभीर जखमी केले.
 

Web Title: Knife attack on Young man in nalasopara